बारा हजार कोटींची परकी गुंतवणूक

पीटीआय
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात नोव्हेंबर महिन्यात १२ हजार २६० कोटींची गुंतवणूक झाली आहे. गेल्या दहा महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे.

नवी दिल्ली - तेजीच्या लाटेवर स्वार होत परकी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात नोव्हेंबर महिन्यात १२ हजार २६० कोटींची गुंतवणूक झाली आहे. गेल्या दहा महिन्यांतील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहे. याच कालावधीत चलन बाजारात रुपयाची कामगिरी उंचावली आहे. या सर्व घडामोडी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पोषक ठरत असल्याने परकी गुंतवणूकदारांनी बाजारातील ओघ वाढवला असल्याचे जाणकारांचे म्हणने आहे. ‘डिपॉझिटरी‘च्या आकडेवारीनुसार परकी गुंतवणूकदारांनी ६ हजार ९१३ कोटी भांडवली बाजारात आणि ५ हजार ३४७ कोटी डेट बाजारात गुंतवले आहेत. याआधी सप्टेंबर अणि ऑक्‍टोबर या दोन महिन्यांमध्ये परकी गुंतवणूकदारांनी तब्बल ६० हजार कोटी बाजारातून काढून घेतले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकूण ७ हजार ३०० कोटींची गुंतवणूक केली होती. नोव्हेंबरमधील गुंतवणूक गेल्या १० महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक ठरली. परकी गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात बाजारात २२ हजार २४० कोटींची गुंतवणूक केली होती. चालू वर्षात परकी गुंतवणूकदारांनी भांडवली आणि रोखे बाजारात असे एकूण ८८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12000 crore rupees foreign investment