येत्या वर्षात सोनं जाणार 60 हजाराच्या पार; सोन्याचा दर 63 हजारांवर जाण्याची शक्यता

संदीप चव्हाण
Thursday, 31 December 2020

कोरोना काळात आलेल्या आर्थिक मंदीच्या वातावरणातही सोन्यानं खाल्ला भाव

मुंबई : येत्या वर्षांत सोन्याला चांगलाच दर मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात सोनं थोडे थोडकं नव्हे तर तब्बल 63 हजारावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रोजच सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये चढउतार सुरू आहेत. या वर्षी सोन्याच्या दराने 56 हजाराचा टप्पा ओलांडला होता. पण, रशियात स्तुतनिक व्ही कोरोना लस येतात सोन्याचा दर कमी झाला. सध्या सोने 50 हजाराच्या आसपासच गेल्या महिनाभरापासून घुटमळतेय. पण, येत्या वर्षात लग्न सराई असल्याने सोन्याला मागणीही वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बातमी : प्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण

याआधी कसा होता सोन्याचा दर... पाहुयात...

  • 2020 मध्ये सोन्याच्या दरात 28 टक्के वाढ झाली 
  • रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याचे दर कमी झाले
  • 30 ऑक्टोबरला सोन्याचा दर 50,699 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  • 9 नोव्हेंबरला तो वाढून 52,167 रुपये झाला होता
  • डिसेंबरमध्येही सोन्याच्या दरात काहीशी वाढ दिसली

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

कोरोना काळात आर्थिक संकट आलं होतं. तरीदेखील सोन्यानं आपला भाव कायम राखला होता. आता नवीन वर्षात लग्नसराई असल्याने सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. 63,000 रुपयांवर प्रतितोळा सोनं होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे सोनं खरेदी करणार असाल तर आताच विचार करा. 

( संपादन - सुमित बागुल )

in 2021 gold prices will touch mark of 63 thousand per ten gram says experts

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in 2021 gold prices will touch mark of 63 thousand per ten gram says experts