आंध्र प्रदेशात २२४ कोटींचा जीएसटी गैरव्यवहार उघड 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

हैदराबाद - आंध्र प्रदेशातील आठ कंपन्यांनी बनावट बिलाद्वारे केलेला २२४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे.  या गैरव्यवहारातील प्रमुख संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १९.७५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याचबरोबर लोखंड आणि पोलाद उत्पादनांच्या व्यापार करणाऱ्या या कंपन्यांची कार्यालये आणि निवासी वसाहती यावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

या कंपन्या बांधकामासाठी लागणारे टीएमटी बार, एमएस बार आणि एमएस फ्लॅट आदी उत्पादनांचा पुरवठा न करता याबाबत बनावट बिले तयार करीत होत्या. नंतर त्या इतर करदात्यांच्या नावाने ‘इनपूट टॅक्‍स क्रेडिट’ मिळवीत होत्या. हा प्रकार जुलै २०१७ पासून सुरू होता. या कंपन्यांनी १ हजार २८९ कोटी रुपयांची बनावट बिले बनवून २२४ कोटी रुपयांचा ‘इनपूट टॅक्‍स क्रेडिट’ मिळविले. या कंपन्या बनावट व्यापार,  ताळेबंद वाढवून दाखविणे आणि एकमेकांना बनावट बिले पुरविणे, असे प्रकार करीत होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 224 crore in Andhra Pradesh GST scam exposed