'इन्कम टॅक्स रिटर्न' भरण्यासाठी आता उरले फक्त चार दिवस 

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

मुंबई: 'इन्कम टॅक्स रिटर्न' अर्थात प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवली. यापूर्वी ही मुदत 31 जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली होती. मात्र त्यांनतर 31 ऑगस्टपर्यंत विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली होती. 

अर्थविषयक अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी www.sakalmoney.com ला भेट द्या 

 'इन्कम टॅक्स रिटर्न' 31 ऑगस्टपर्यंत न भरल्यास
येत्या 31 ऑगस्टपर्यंत कोणत्याही दंडाविना 31 ऑगस्टपर्यंत संबंधितांना विवरणपत्र भरता येणार आहे. मात्र, मात्र त्यानंतर विवरणपत्र भरणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. प्राप्तिकर अधिनियमातील कलम 139 (1) अन्वये आर्थिक वर्ष 2018-19चे विवरणपत्र निर्धारित वेळेत दाखल न केल्यास संबंधितांना कलम 234 एफ अन्वये विलंब शुल्कासह विवरणपत्र भरावे लागणार आहे.

पाच लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्याने 31 ऑगस्ट 2018नंतर आणि 31 डिसेंबर 2018पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यास त्याला पाच हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. करदात्याने 31 डिसेंबरनंतर विवरणपत्र भरल्यास त्याला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. 
करदाता 31 मार्च 2019पर्यंत दहा हजार रुपये विलंब शुल्कासह प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकतो. आर्थिक वर्ष 2018-19 या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र कोणत्याही परिस्थितीत दाखल करता येणार नाही

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 days left to file your I-T returns and avoid a penalty