बिल गेट्स यांच्या आवडीची 5 पुस्तकं, वाचून बघा, कदाचित तुम्हालाही यश मिळेल...

Bill-Gates
Bill-Gatessakal

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बिल गेट्स, त्यांच्या यशामागे अनेक रहस्ये आहेत. या रहस्यामधील एक रहस्य म्हणजे पुस्तके... त्यांच्या यशामागे अशीही काही पुस्तके आहेत जी वाचल्यावर आयुष्याचा धडा मिळतो. अशा काही पुस्तकांचा त्यांनी वेळोवेळी नोट्समध्ये उल्लेख केला आहे. ते म्हणतात की या पुस्तकांच्या आत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कोणालाही यशस्वी व्यक्ती बनवू शकतात. (5 Life-Changing Books That Bill Gates Says He Can’t Put Down)

बिल गेट्स कायम नवीन आणि चांगली पुस्तके वाचल्यानंतर आपला अनुभव शेअर करत असतात. आज आम्ही त्यांच्या आवडीच्या 5 पुस्तकांविषयी माहिती देणार आहोत.

The Ride of a Lifetime : याचे लेखक बॉब इगर (Bob Iger) आहेत. बिल गेट्स यांच्या नोट्सनुसार एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओमध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत ते या पुस्तकात चांगल्या पद्धतीने सांगण्यात आले आहे. यात त्यांनी आपल्या Disney प्रवासाचा उल्लेखही केला आहे.

Where Good Ideas Come From : या पुस्तकाचे लेखक स्टीव्हन जॉन्सन आहेत, त्यानुसार यशस्वी होण्यासाठी नाविन्यपूर्णता असणे गरजेचे आहे. बिल गेट्स यांच्या म्हणण्यानुसार व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रात जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप पुस्तक खास आहे.

Bill-Gates
नकारात्मक कल, सावधगिरी आवश्यक!

The Choice : या पुस्तकाचे लेखक डॉ एडिथ अवा ईगर आहेत. बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, कोविड 19 साथीच्या अडचणीच्या काळात हे पुस्तक वाचल्याने धैर्य मिळेल आणि अडचणींना सामोरे जायला मदत होईल.

Good Economics for Hard Times : अभिजित व्ही. बॅनर्जी आणि एस्तेर डुफलो ( Esther Duflo ) यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांमधील इमिग्रेशन, असमानता आणि राजकारणाबद्दल आर्थिक दृष्टिकोनातून सांगते.

Cloud Atlas : डेव्हिड मिशेल यांनी ही कादंबरी लिहिली आहे. हजारो वर्षांत बदलणाऱ्या आणि न बदलणार्‍या गोष्टींचा उल्लेख आहे असल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. तसेच यात मानवी मूल्यांबद्दल सुध्दा माहिती दिली आहे.

Bill-Gates
‘ग्रॅच्युइटी’ कशी ठरते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com