देशात ५जी स्पेक्‍ट्रम महागडे

पीटीआय
Wednesday, 5 June 2019

रास्त दरात स्पेक्‍ट्रम द्यावेत 
‘सीओएआय’चे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलेश शर्मा म्हणाले, ‘‘स्पेक्‍ट्रमची किंमत अवाजवी आहे. सरकारने सर्व कंपन्यांना ५ जी स्पेक्‍ट्रम रास्त दरात मिळतील, याची खबरदारी घ्यावी. याचबरोबर अधिभार आणि कर कमी करून दूरसंचार क्षेत्राला सरकारने बळ देण्याची गरज आहे.’

‘सीओएआय’चा दावा; दक्षिण कोरिया, अमेरिकेपेक्षा किंमत जास्त
नवी दिल्ली - दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यापेक्षा भारतात ५ जी स्पेक्‍ट्रमची आधार किंमत ३० ते ४० टक्के जास्त आहे, असा दावा ‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीओएआय) मंगळवारी केला. 

केंद्र सरकारने चालू वर्षात ५ जी स्पेक्‍ट्रमचा लिलाव करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सीओएआय’ने ५जी स्पेक्‍ट्रम धोरणविषयक कार्यशाळा आज आयोजित केली होती. या वेळी ‘सीओएआय’चे महासंचालक राजन मॅथ्यूज म्हणाले, ‘‘बहुतांश दूरसंचार कंपन्यांनी ५ जी स्पेक्‍ट्रम हे अतिशय महागडे असल्याची तक्रार केली. ते परवडण्याजोगे नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता, भारतात स्पेक्‍ट्रमची किंमत दक्षिण कोरिया आणि अमेरिकेपेक्षा ३० ते ४० टक्के अधिक आहे.’

स्पेक्‍ट्रमची किंमत ४.९ लाख कोटी 
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ८ हजार ६४४ मेगाहर्टझच्या दूरसंचार लहरींचा लिलाव करण्याची शिफारस केली आहे. यात ५ जी स्पेक्‍ट्रमचा समावेश आहे. यासाठी अंदाजे आधार किंमत ४.९ लाख कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5G Spectrum Expensive in India