esakal | लॉकडाउनच्या काळात लोकांना ईपीएफने दिला सर्वात मोठा आधार; महाराष्ट्रात पाच महिन्यात काढले तब्बल 7 हजार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

money.

जगभरामध्ये कोरोनाचे संकट सुरु आहे. अशा दिवसांमध्ये लोकांना Employees Provident Fund (EPF)ची मदत झाली आहे. 25 मार्च ते 31 ऑगस्‍ट या दिवसांमध्ये देशभर ईपीएफ मेंबर्स (EPF Members)नी तब्बल 39 हजार कोटी रुपये काढले आहे, अशी माहिती आज लोकसभेत देण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळात लोकांना ईपीएफने दिला सर्वात मोठा आधार; महाराष्ट्रात पाच महिन्यात काढले तब्बल 7 हजार कोटी

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : जगभरामध्ये कोरोनाचे संकट सुरु आहे. या दिवसांमध्ये देशामध्ये अनेक लाखो तरुणांची नोकरी गेली आहे. त्यात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पगार कपात केली आहे. या लॉकडाऊमुळे सर्वांचं आर्थिक गणितच कोलमडले आहे. अशा दिवसांमध्ये लोकांना Employees Provident Fund (EPF)ची मदत झाली आहे. 25 मार्च ते 31 ऑगस्‍ट या दिवसांमध्ये देशभर ईपीएफ मेंबर्स (EPF Members)नी तब्बल 39 हजार कोटी रुपये काढले आहे, अशी माहिती आज लोकसभेत देण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रामधील कर्मचाऱ्यांनी 7,837.85 कोटी रुपये काढले आहेत. कर्जाचे हफ्ते चुकवणे आणि घरं चालविण्यासाठी या पैशाचा उपयोग करण्यात आला आहे. कर्नाटक 5,743.96 कोटी, तमिळनाडू आणि पाँडीचेरीत 4,984.51 कोटी काढण्यात आले आहेत.'