esakal | सातवा वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

सातवा वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू होणार 

सातवा वेतन आयोग एक जानेवारी पासून लागू होणार 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर उत्तर दिले आहे. सरकारच्या निर्णयामुळे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2016 पासून सातवा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. केंद्राने लागू केला तेव्हापासून राज्यात देखील सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठी काही कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यावर सरकारने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. येत्या 5 डिसेंबरला के.पी. बक्षी समिती अहवाल सादर करणार असून सातवा वेतन आयोग मात्र येत्या एक जानेवारी 2019 लागू करण्यात येणार असल्याचे  केसरकर यांनी सांगितले. 

loading image