esakal | करचुकवेगिरी टाळण्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhaar holders without PAN to be auto-applied for PAN from Sept 1

पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे

करचुकवेगिरी टाळण्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: पॅन कार्ड काढण्याबाबतचा एक महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड नाही किंवा त्यांनी पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज देखील केलेला नाही मात्र आधार कार्ड आहे आणि त्यांनी आधार कार्ड क्रमांक कोणत्याही व्यवहारावेळी जोडला असेल तर त्यांना 1 सप्टेंबरपासून ऑटोमॅटिक पॅन कार्ड दिले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज असणार नाही. जास्तीत जास्त नागरिकांना कर संरचनेत आणण्यासाठी किंवा करचुकवेगिरी टाळण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड असणे सक्तीचे असणार आहे. मात्र अजूनही देशातील अनेक नागरिकांकडे पॅन कार्ड नाही. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन कार्ड नसल्यामुळे व्यवहार ठप्प होऊ नयेत यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आधार कार्ड क्रमांकाचा उल्लेख करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र तरीदेखील नागरिकांनी पॅन कार्ड विषयी तत्परता दाखविलेली नाही. परिणामी सीबीडीटीने एक पाऊल पुढे जात हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॅन कार्ड काढू इच्छिणाऱ्याला फक्त आधार कार्ड क्रमांक पडताळणी (व्हेरिफाय) करावा लागेल. 

पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी सरकारने याअगोदरच आधार कार्ड ग्राहय धरले आहे. आधार कार्ड शिवाय आणखी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज भासत नाही. 

loading image
go to top