अपघाती क्षेत्र; सावधानता आवश्यक

Alert
Alert

गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३१ हजार ९७ तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९ हजार १३६ अंशांवर बंद झाला आहे. निफ्टीच्या टेक्‍निकल चार्टनुसार, जानेवारीपासून मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविल्यानंतर ७ हजार ५११ पासून निफ्टीने एप्रिल महिन्यात ९ हजार ८८९ पर्यंत जोरदार उसळी दर्शविली. ९ हजार ८८९ पातळीपर्यंत उसळी किंवा बाउन्सबॅक दर्शविल्यानांतर निफ्टी ९ हजार ८८९ ते ९ हजार ०४३ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवत आहे. आगामी कालावधीत ९ हजार या पातळी खाली गेल्यास निफ्टी पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरण दर्शवू शकेल. किंमत व वेळेच्या चक्रानुसार जून अखेर ते १२ जुलैपर्यंत निफ्टी ७ हजार ५०० पर्यंत तसेच ७ हजार ५०० या पातळीखाली गेल्यास निफ्टीमध्ये आणखी घसरण होऊ शकते. चार्टवरून हा बांधण्यात आलेल्या केवळ एक अंदाज आहे. जो चुकू देखील शकतो. मात्र चार्टनुसार मिळणारा संकेत लक्षात घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

चार्टनुसार, जानेवारीपासून बाजारात झालेली मोठ्या प्रमाणातील पडझड ही केवळ ‘करेक्‍शन’ नसून तेजीचे चक्र संपून मंदीच्या चक्राची सुरवात असल्याचे लक्षात येत आहे. मंदीच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात पडझड दर्शविल्यानंतर बाजार काही काळ तेजी म्हणजेच ‘बाऊन्स बॅक’ दर्शवितो आणि पुन्हा पडझड दर्शवितो .एखादा चेंडू  दहाव्या मजल्यावरून खाली पडल्यावर जसा काही मजले उसळी दर्शवून पुन्हा खाली येतो तशाच पद्धतीने मंदीचे चक्र काम करते. २२ सप्टेंबर २०१८रोजी अशाच प्रकारे ‘डीएचएफएल’ या कंपनीच्या शेअरने प्रथम मोठ्या प्रमाणात पडझड दर्शवून तेजीच्या चक्रातून बाहेर पडल्याचे संकेत दिले. यानंतर काही काळ तात्पुरती उसळी दर्शविल्यानंतर ‘डीएचएफएल’ या कंपनीच्या शेअरने पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली. असेच काहीसे चित्र येस बॅंकेच्या बाबतीत पाहण्यास मिळाले. वर्ष २००८ मध्ये देखील बाजाराने अशाच प्रकारे पडझड दर्शविली होती. फंडामेंटल्सनुसार विचार करता जानेवारी २०२० मध्ये बाजार ‘प्राईस अर्निंग रेशो’नुसार (पीई) खुप महाग झाला होता. यानंतर कोरोनाच्या संकटामुळे महाग झालेल्या बाजाराने मोठया प्रमाणात घसरण दर्शविली.

सद्यस्थितीमध्ये बाजाराचे ‘पीई’ मुल्याकंन मध्यम आहे. मात्र मागील लेखांमधे नमूद केल्यानुसार लॉकडाउनमुळे आगामी कालावधीमध्ये कंपन्यांची कमाई म्हणजेच मिळकतीत घसरण होणे अपेक्षित असल्याने जिथे बाजार स्वस्त वाटत आहे तिथे तो महाग झाला आहे.

‘अपघात प्रवण क्षेत्र; सावकाश जा’ 
ज्या ठिकाणी पूर्वी अपघात झालेला असतो तिथे ज्याप्रमाणे पुढील काळात अपघात टाळण्यासाठी  ‘अपघात प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा’ म्हणून पाटी लावण्यात येते त्याच प्रमाणे सद्यस्थितीतील चार्टचे संकेत हे भीती दाखविण्यासाठी नाही तर सावधान होण्यासाठी आहे हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. चार्टनुसार, पुढील कालावधीत मंदीचे संकेत मिळाल्यास ज्या ट्रेडर्सने पूर्वी उत्तम नफा मिळविला आहे तसेच अंदाज चुकल्यास तोटा सहन करू शकतात त्या ट्रेडर्सने पुढील महिन्यातील ‘पुट’ म्हणजेच मर्यादित धोका स्वीकारून मंदीचा व्यवहार करणे योग्य ठरेल.

यामुळे अंदाज चुकल्यास तोटा मर्यादित ठेवणे शक्‍य होईल तसेच ‘लाँग टर्म’साठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी देखील बाजारातील एकूण गुंतवणूक ‘लाँग टर्म’साठी ३० ते ५० टक्केच मर्यादित ठेऊन   मॅरिको,गोदरेज कन्झ्युमरसारख्या उत्तम व्यवसाय असणाऱ्या विविध कंपन्यांमधेच गुंतवणूक करणे हितावह ठरेल. ‘लाँग टर्म’ची गुंतवणूक करताना करण्यापेक्षा गुतंवणूक मर्यादित ठेवणे योग्य ठरेल. कारण हा केवळ एक अंदाज आहे. म्हणजेच अपघाती क्षेत्र आहे अपघात होईलच असे नाही. मात्र सावधानता बाळगणे अत्यंत आवश्‍यक आहे.(सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com