करकायदा : आगाऊ करभरणा आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax Return

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पगारदार प्राप्तिकरदात्यांनी जर एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारली असेल आणि त्यांना दोन फॉर्म १६ मिळाले असतील, तर त्यांनी दोन्ही पगार व सर्व अंदाजे उत्पनाचे स्तोत्र एकत्र करायला हवेत.

करकायदा : आगाऊ करभरणा आवश्यक

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पगारदार प्राप्तिकरदात्यांनी जर एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारली असेल आणि त्यांना दोन फॉर्म १६ मिळाले असतील, तर त्यांनी दोन्ही पगार व सर्व अंदाजे उत्पनाचे स्तोत्र एकत्र करायला हवेत. तसेच प्राप्तिकर वजावट, प्राप्तिकर सवलत आणि उदगम करकपात (टीडीएस), करवसुली (टीसीएस) केलेली रक्कम व इतर प्राप्तिकर भरणा रक्कम वजा करून करपात्र उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागत आहे का, याची शहानिशा करावी.

सर्व मालक हे पगारदार व्यक्तींना मिळणाऱ्या पगारातून, नमूद केलेला स्लॅब दर व टक्केवारीनुसार करकपात करीत असतात. सर्व पगाराची रक्कम व इतर अंदाजे उत्पनाचे स्तोत्र एकत्र करून; तसेच सर्व कर वजावट करून देखील करपात्र उत्त्पन्न येत असेल आणि करकपात कमी रकमेने केल्याने एकूण प्राप्तिकर १० हजार रुपयांपेक्षा जास्त भरायला येत असेल तर अशा वेळेस प्राप्तिकरदात्यांनी आगाऊ कर रक्कम १५ मार्च २०२२ किंवा त्यापूर्वी भरायला हवा.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आगाऊ प्राप्तिकर भरणा चार हप्त्यांत करायचा होता. त्यापैकी आता शेवटची तारीख जवळ आली आहे.

जर आगाऊ कर १५ मार्च २०२२ च्या आधी भरला नाही आणि पुढील आकारणी वर्ष २०२२-२३ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरायच्या आधी, प्राप्तिकर भरावयास आला तर त्यावर कलम २३४ बी व २३४ सी नुसार व्याज कमाल एक टक्का प्रति महिना लागू होऊ शकतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

उदा. जुन्या प्राप्तिकर प्रणालीनुसार

जेव्हा दोन पगारांचे उत्पन्नस्तोत्र आहेत आणि हे पगारदार प्राप्तिकरदात्यांना माहिती आहे, तर अशा प्राप्तिकरदात्यांनी त्याच आर्थिक वर्षात, संपूर्ण उत्पन्नाचे पूर्व प्राप्तिकर नियोजन करणे, प्राप्तिकराची गणना आणि पूर्ण हिशोब अचूक ठेवणे आवश्यक आहे. असे केल्यानेच आगाऊ कर वेळेत भरला जातो आणि व्याजदेखील लागण्याची शक्यता नसते. ही परिस्थिती उत्पन्न जास्त असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांची होऊ शकते, म्हणून आगाऊ कर १५ मार्च २०२२ किंवा त्यापूर्वी १०० टक्के भरणे गरजेचे आहे.(लेखक कर सल्लागार आहेत.)

Web Title: Ad Sukrut Dev Writes Tax Law

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Arthavishwaincome taxlaw
go to top