Adani Group : अदानीकडून ऑर्डर मिळाल्याने 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी, हे वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group

Adani Group : अदानीकडून ऑर्डर मिळाल्याने 'या' शेअर्समध्ये मोठी तेजी, हे वाचाच

पॉलिमर आणि कंपोझिट उत्पादने बनवणाऱ्या टाइम टेक्नोप्लास्ट (Time Technoplast) या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी 19 टक्क्यांनी वाढ झाली. इंट्रा-डे ट्रेडमध्ये कंपनीच्या शेअर्सने बीएसईवर 99.60 रुपयांची किंमत गाठली.

टाइम टेक्नोप्लास्ट कंपनीला अदानी टोटल गॅसकडून (Adani Total Gas) 75 कोटी रुपयांची रिपीट ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतरच कंपनीच्या शेअर्समध्ये दमदार तेजी आली आहे. त्यामुळेच सध्या शेअर 7.57 टक्क्यांनी वाढून 90.20 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. (Adani Group Adani Total Gas has given order to Time Technoplast as it increases growth)

कंपनीला अदानी टोटल गॅसकडून टाईप-IV कंपोझिट सिलिंडरपासून बनवलेल्या सीएनजी कॅस्केडच्या पुरवठ्यासाठी 75 कोटी रुपयांची पुनरावृत्ती ऑर्डर प्राप्त झाल्याची माहिती टाईम टेक्नोप्लास्टने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली. या कॅस्केड्सची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल.

टाइम टेक्नोप्लास्ट ही एक मल्टीनॅशनल कंपनी असून टेक्नोलॉजी बेस्ड पॉलिमर आणि कंपोझिट प्रोडक्ट्स बनवणारी आघाडीची उत्पादक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 (H1FY23) च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा महसूल 18 टक्क्यांनी वाढला आणि तो 196.9 कोटी रुपयांवर पोहोचला. त्याच वेळी, करानंतरचा नफा 19.5 टक्क्यांनी वाढून 942 कोटी रुपये झाला आहे.

हेही वाचा: Adani NDTV Deal : प्रणय-राधिका रॉय यांना अदानींवर विश्वास; म्हणाले आता पत्रकारितेची मूल्य...

कंपनी व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट्सच्या रेव्हेन्यू शेअरला मजबूत करण्यासाठी काम करत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. अशात व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट्सच्या विभागात 28 टक्के वाढ झाली आहे. तरीही, सध्याच्या वातावरणामुळे मार्जिनवर किरकोळ परिणाम झाला आहे. तरीही कंपनीच्या भविष्यातील कामगिरीबद्दल सकारात्मक असल्याचे  व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Gautam Adani : मार्केटची दिशा बदलणार?; 'या' व्यवसायातही खणखणणार अदानींचं नाणं

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.