सेबीची अदानी विल्मरच्या IPOवर बंदी, चौकशी ठरली कारण...

सेबीची अदानी विल्मरच्या IPOवर बंदी, चौकशी ठरली कारण...

बाजार नियामक (Market Regulator) सेबीने अदानी विल्मरच्या (Adani Wilmar) आयपीओवर बंदी घातली आहे. अदानी विल्मार 4500 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार होते, पण सध्या या योजनेला ब्रेक लावण्यात आला आहे. याचे कारण अदानी एंटरप्राइझविरुद्ध सुरू असलेली चौकशी. फॉरेन पोर्टफोलियो इनवेस्टमेंटच्या चौकशीमुळे सेबीने अदानी विल्मारचा आयपीओ सध्या थांबवला आहे. पोर्टपासून ते ऊर्जेच्या व्यवसायातील अदानी ग्रुपला यामुळे मोठा धक्का बसला आहे. सध्या अदानी विल्मारचा 4500 कोटी रुपयांचा आयपीओ रोखण्यात आल्याचे सेबीच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.

अदानी एंटरप्राइझविरोधात सुरू असलेल्या चौकशीमुळे सेबीने हे पाऊल उचलल्याचे, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले. अदानी विल्मारमध्ये (Adani Wilmar) अदानी एंटरप्राइझचा ५० टक्के हिस्सा आहे. लोकप्रिय खाद्य तेल ब्रँड फॉर्च्युन अदानी विल्मर (Adani Wilmar) बनवतो. आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या कंपनीची कोणत्याही विभागात चौकशी सुरू असेल तर त्याचा आयपीओ 90 दिवसांसाठी मंजूर होऊ शकत नाही असे सेबीचे धोरण आहेस. त्यानंतरही 45 दिवस आयपीओ टाळता येऊ शकतो. अदानी गटाने याबाबत अद्याप काहीही वक्तव्य केले नाही.

सेबीची अदानी विल्मरच्या IPOवर बंदी, चौकशी ठरली कारण...
अफगाणिस्तानमध्ये 300 तालिबान्यांचा खात्मा, अनेकजण बंदी

मॉरिशसमधील नोंदणीकृत काही परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकीमुळे अदानी एंटरप्राइझची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. सेबीला अद्याप मॉरिशस नियामकाकडून (Regulator) कोणतीही माहिती मिळालेली नाही. याआधी जूनमध्ये कमी किंमतीच्या 'गोफर्स्ट' (GoFirst) या विमान कंपनीच्या आयपीओलाही स्थगिती दिली होती. या कंपनीच्या प्रमोटरविरोधात चौकशी सुरु असल्याने सेबीने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com