'ही' दरवाढ केल्याने सरकारच्या तिजोरीत किमान ५०० कोटींच्या अतिरिक्त महसुलाची भर

वृत्तसंस्था
Monday, 1 June 2020

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ केल्याने सरकारच्या तिजोरीत दर महिन्याला किमान ५०० कोटींच्या अतिरिक्त महसुलाची भर पडणार आहे.

मुंबई - राज्य सरकारने महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) अधिभार वाढवल्याने सोमवारपासून राज्यात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ केल्याने सरकारच्या तिजोरीत दर महिन्याला किमान ५०० कोटींच्या अतिरिक्त महसुलाची भर पडणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात पेट्रोलवर २६ टक्के तर डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारण्यात येतो. पेट्रोलवरील अधिभार आता १०.१२ रुपये करण्यात आला आहे. याआधी तो ८.१२ रुपये होता. डिझेलवरील अधिभार १ रुपयांवरून ३ रुपये करण्यात आला आहे. 

दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८.३२ रुपये आणि डिझेलचा दर ६८.२१ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

 देशातील प्रमुख शहरांतील इंधनाचे दर

इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार, सोमवारी मुंबई वगळता इतर प्रमुख शहरांत इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नवी दिल्ली:
 पेट्रोल 71.26 रुपये
 डिझेल 69.39 रुपये

 चेन्नई:
 पेट्रोल 75.54 रुपये
 डिझेल 68.22 रुपये

कोलकाता: 
पेट्रोल 73.30 रुपये
 डिझेल 65.62 रुपये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional revenue Rs 500 crore government due to hike in petrol & diesel prices