esakal | रिलायन्सची चांदी! अबुधाबीतील कंपनीची 5512 कोटींची गुंतवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

RELIANCE GOT INVESTMENT FROM ADIA

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) मोठी घोषणा केली आहे.

रिलायन्सची चांदी! अबुधाबीतील कंपनीची 5512 कोटींची गुंतवणूक

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने (RRVL) मोठी घोषणा केली आहे. अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटीची (Abu Dhabi Investment Authority)उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये 5 हजार 512 कोटी रुपयांची गुंतवणुक करणार आहे.  

ADIAच्या गुंतवणुकीच्या मदतीने  रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने सिल्व्हर लेक, केकेआर, जनरल अटलांटिक, मुबादला, जीआयसी (GIC) आणि टीपीजी (TPG) या जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांकडून अवघ्या चार आठवड्यांत 37 हजार 710 कोटी रुपये उभे केले आहेत.

यापुर्वी आरआरव्हीएलचे  प्री-मनी इक्विटी मूल्य 42.85 लाख कोटी रुपये होते. आता एडीआयएच्या गुंतवणुकीने आरआरव्हीएलमध्ये १.२० टक्के इक्विटी शेअर्स वाढणार आहेत. मंगळवारी बाजारपेठे बंद होताना ही घोषणा करण्यात आली. सध्या या दोन्ही कंपनीमधील व्यवहार नियामक आणि इतर पारंपरिक मंजुरीनंतर लगेच पुर्ण होणार आहे.

आरआरव्हीएलची उपकंपनी रिलायन्स रिटेल भारतातील सर्वात मोठा, सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वात फायदेशीर किरकोळ व्यवसाय चालवत आहे. आरआरव्हीएल ही आरआयएलची उपकंपनी आहे आणि आरआयएल ग्रुपअंतर्गत सर्व किरकोळ कंपन्यांची कंपनी आहे.