Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर वाढले

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 28 October 2020

मागील 2 दिवसांपासून सोन्याच्या दरात घट झाली होती पण आज सोने वधारले आहे.

नवी दिल्ली: मागील 2 दिवसांपासून सोन्याच्या दरात घट झाली होती पण आज सोने वधारले आहे. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव 188 रुपयांनी वाढले आहेत. तर दुसऱ्या बाजूला चांदीचे दरही वाढले आहेत. आजचे चांदीचे दर 342 रुपयांनी वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, परदेशी बाजार आणि डॉलरमधील घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 

यापुर्वी सोमवारी सोन्याच्या दरात 59 रुपयांनी घसरूण होऊन प्रति 10 ग्रॅमला 51 हजार 34 रुपये झाले होते, चांदी प्रति किलोला 753 रुपयांनी घसरूण 62 हजार 8 रुपयांवर आली होती. मंगळवारीही सोन्याच्या दरात घट झाली होती. मंगळवारी सोने 137 रुपयांनी उतरले होते तर चांदी 475 रुपयांनी महागले होते.  

IRDAIने जारी केले health insuranceचे नवीन नियम; होतील अनेक फायदे

बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 188 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅमला 51 हजार 220 झाले. यापुर्वीच्या सत्रात सोने 51 हजार 32 रुपयांवर बंद झाले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 1906.70 डॉलर होते. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी स्थिर राहून 24.45 रुपयांवर बाजार करताना दिसली. 

आज दिल्ली सराफा बाजारात चांदी प्रति किलोला 342 रुपयांनी वाढून 62 हजार 712 रुपये  झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरूण डॉलरचे दर 73.87 वर बंद झाले.   

बॉयकॉट चायना नावालाच; भारतात चिनी स्मार्टफोनची रेकॉर्डब्रेक विक्री!

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-
दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after consecutive two days slumps rate of gold today gold went high