एअर इंडिया कर्मचारी संघटनांनी मागितले ५०,००० कोटींचे आर्थिक पॅकेज

वृत्तसंस्था
Thursday, 28 May 2020

एअर इंडिया कर्मचारी संघटना आणि स्टाफ संघटनांनी संयुक्तपणे भारत सरकारकडे  ५०,००० कोटी रुपयांची मदत मागितली आहे.  देशासाठी एअर इंडिया आवश्यक आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे.  

एअर इंडिया कर्मचारी संघटना आणि स्टाफ संघटनांनी संयुक्तपणे  भारत सरकारकडे ५०,००० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. देशासाठी एअर इंडिया आवश्यक आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे. या संघटनांनी संयुक्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवले आहे. एअर इंडियाची देशाला आवश्यकता आहे. विशेषत: संकटकाळात एअर इंडियाचे महत्त्व आहे. एअर इंडियाला दिलेल्या विशेष आर्थिक पॅकेजमुळे फक्त एअर इंडियालाच मदत होणार नाही तर त्याचा लाभ सर्व विमानसेवा क्षेत्राला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलादेखील होईल, असेही पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याआधी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये सरकारने विविध क्षेत्रांना याआधी केलेल्या मदतीचा आणि रिझर्व्ह बॅंकेने उचललेल्या पावलांचाही समावेश होता. संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

आघाडीच्या अनेक पतमानांकन संस्थांनी कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात चालू आर्थिक वर्षात ५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

'तुम्ही अर्थव्यवस्थेला आणि उद्योग-धंद्यांना चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजसाठी आम्ही आपल्याला धन्यवाद देतो. सद्यस्थितीत विमानसेवा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे यावर आपणही सहमत व्हाल. म्हणूनच देशातील विमानसेवा क्षेत्राला चालना देणे अत्यंत आवश्यक आहे आणि या क्षेत्राचे कामकाज लवकरात लवकर सुरळीत करणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. हे सर्व लक्षात घेता आम्ही आपल्याला विनंती करतो की एअर इंडियाला ५०,००० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे. यामुळे दीर्घकालात एअर इंडिया भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात सक्षम विमानसेवा कंपनी म्हणून उदयास येईल', असे पंतप्रधानांना एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...

संकटकाळात एअर इंडियाने जोखीम घेऊन चांगली कामगिरी केली आहे. वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची वाहतूक करण्यासाठी भारत आणि चीनसहीत अनेक देशांमध्ये एअर इंडियाने वाहतूक केली आहे. एअर इंडियाने राष्टहिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संकट काळात देशासाठी एअर इंडियाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे, असेही या पत्रात पुढे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India Employees unions seek package of 50,000 crores