esakal | रिलायन्स जिओला धक्का; एअरटेलची नवी ऑफर बघाच 
sakal

बोलून बातमी शोधा

रिलायन्स जिओला धक्का; एअरटेलची नवी ऑफर बघाच 

रिलायन्स जिओला धक्का; एअरटेलची नवी ऑफर बघाच 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई:  दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल सज्ज झाली आहे. एअरटेलने नवा 97 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन बाजारात आणत आहेत किंवा जुन्या प्लॅनमध्ये बदल करून नवीन स्वरुपात ग्राहकांपुढे सादर करत आहेत. 

नव्या 97 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिवशी 100 एसएमएस आणि 2 जीबी डेटाची सुविधा देण्यात येणार आहे. एअरटेलचा हा नवा प्लॅन आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक या राज्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. एअरटेलने मागील वर्षी 97 रुपये रिचार्जचा प्रीपेड प्लॅन 1.5 जीबी डेटा आणि 350 मिनिटांच्या व्हॉईस कॉलिंगच्या सुविधेने बाजारात आणला होता. मात्र आता अधिक सुविधांसह नव्या स्वरुपात हा प्लॅन बाजारात आणण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता (वॅल्हिडीटी) 14 दिवसांची असणार आहे. याबरोबरच एअरटेलने 35 रुपये, 65 रु, 95 रु आणि 99 रुपयांचे प्लॅन बाजारात आणले आहेत. एअरटेलचा 97 रुपयांचा कॉम्बो प्लॅन जिओच्या 98 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनशी स्पर्धा करणार आहे.

मात्र जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, 300 एसएमएस आणि जिओ टीव्ही, जिओम्युझिक आणि इतर काही अॅपची सुविधाही मिळणार आहे. त्याशिवाय जिओच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असल्यामुळे एअरटेलच्या प्लॅनपेक्षा जिओचा प्लॅन वरचढ ठरणार आहे.
 

loading image