अजय कुमार येस बँकेचे अंतरिम एमडी आणि सीईओ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 January 2019

मुंबई : प्रसिद्ध बँकर राणा कपूर यांचा येस बँकेतील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपुष्टात आला आहे. आता त्यांच्या जागी अंतरिम व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय कुमार यांची निवड करण्यात आली आहे. कुमार 2016 पासून बँकेचे अकार्यकारी आणि संचालक म्हणून काम पाहत आहेत.

डॉइशे या परदेशी बँकेतील रवनीत गिल हे येत्या 1 मार्च रोजी येस बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. गिल पदावर येईपर्यंत अजय कुमार हे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येस बँकेचे काम बघणार आहेत. 

राणा कपूर यांच्या मुख्याधिकारीपदाची मुदत आज (31 जानेवारी) रोजी संपत आहे. त्यांच्या मुदतवाढीला बँकेच्या भागधारक व संचालक मंडळाने दिलेली मंजुरी रिझव्‍‌र्ह बँकेने नाकारली होती. शिवाय नवा उत्तराधिकारी 31जानेवारीपर्यंत शोधण्याचे बँकेला आदेश दिले होते. यापूर्वी बँकेने कपूर यांना मार्च 2020 पर्यंत प्रमुखपदी राहू देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

डॉइशे बँक या जर्मनीच्या बँकेच्या भारतातील व्यवसायाची जबाबदारी गिल यांच्याकडे होती. डॉइशे बँकेत ते 1991 पासून कार्यरत आहेत. तर 2012 मध्ये त्यांच्याकडे भारतातील व्यवसायाची धुरा सोपविण्यात आली. देशात बँकेच्या 16 शाखा आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Kumar Yes Banks Interim MD and CEO