
अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्राच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ
मुंबई : अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा लि. (Ajmera realty and infra ltd) च्या उत्पन्नात आणि निव्वळ नफ्यात ( income and Profit) या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत चांगली वाढ झाली आहे. अनऑडिटेड आकडेवारीनुसार (unaudited report) कोरोनाच्या थैमानातही त्यांना यावर्षी 22 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला.
एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत त्यांचा महसूल 235 कोटी रुपयांपर्यंत गेला, ही रक्कम मागील वर्षाच्या याच सहामाहीपेक्षा 57 टक्के जास्त होती. तर घरांच्या विक्रीतून त्यांना 217 कोटी रुपये (गेल्यावर्षीपेक्षा 95 टक्के जास्त) मिळाले. या सहा महिन्यांत त्यांनी एक लाख 69 हजार 82 चौरस फुट क्षेत्रफळाची 139 घरे विकली. त्यांचा करपूर्व नफा 29 कोटी रुपये (मागीलवर्षीपेक्षा 103 टक्के जास्त) होता. तर करोत्तर नफा गेल्या वर्षीपेक्षा 121 टक्के जास्त झाल्याचे कंपनीने कळविले आहे.
कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने तसेच गृहकर्जाचे दर बँकांनी घटवल्याने तयार तसेच बांधकाम सुरु असलेल्या घरांची विक्री होण्यासाठी आम्हाला फायदा झाला. यावर्षी वडाळा, घाटकोपर व पुणे येथे तीन नव्या प्रकल्पांची सुरुवात होईल, मुंबई, बंगळुरू व अहमदाबाद येथील परिस्थिती आता सुधारते आहे, असे अजमेरा रिअल्टी चे संचालक धवल अजमेरा म्हणाले. कंपनीने यापूर्वी खर्डी (कसारा) येथे 293 चौरस फुटांची घरे बांधली असून त्याची किंमत 10 लाखांपासून आहे.