तुमच्या SIP ला द्या Top-Up; फायदा होईल दुप्पट, कॅलक्युलेटर वर करा चेक...

SIP
SIPSakal

म्यूचुअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इनव्हेटस्टमेंट प्लॅन (SIP) हा गुंतवणूक करण्याचा अत्यंत लोकप्रिय प्लॅन आहे. SIP लाँग टर्म इनव्हेस्टमेंटला चालना देते आणि यावर कंपाउंडिंगचाही फायदा मिळतो. SIP मध्ये एकरकमी नाही तर दर महिन्याला काही रक्कम गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. त्यामुळेच छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मासिक गुंतवणुकीमुळे यातील जोखीम कमी होते. आणखी एक चांगली गोष्ट ही की बाजारातील चढउतार पाहून तुमची गुंतवणूक कमी किंवा जास्त करता येते. किंवा काही काळासाठी गुंतवणूक थांबवताही येते.

SIP मधील एक खास सुविधा आहे ती म्हणजे Top-Up SIP हा पर्याय. दरवर्षी तुमच्या रेग्युलर SIP मध्ये काही रक्कम आणखी जमा करु शकता. समजा नोकरीच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही 3000 रुपये मासिक SIP चा पर्याय घेतला आहे. पण दरवर्षी तुमची सॅलरी वाढते, मग तुम्ही SIP मध्ये दर वर्षी काही रक्कम Top-Up करु शकता. Top-Up SIP च्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकीचे लक्ष्य लवकर पुर्ण करु शकता. यात रेग्युलर SIP मधून फायदा खूप जास्त आहे.

SIP
फिक्स्ड इन्कमसोबत टॅक्सही वाचवायचा आहे ? मग बँकांच्या या काही स्कीम्स नक्की पाहा...

Calculator: रेग्युलर SIP

मासिक SIP: 3000 रुपये
कार्यकाळ: 20 वर्ष
अंदाजे रिटर्न: 12 टक्के
एकूण गुंतवणूक : 7.20 लाख रुपये
20 वर्षांनंतर SIP ची व्हॅल्यू: 30 लाख रुपये

फायदा: 22.8 लाख रुपये

Calculator: Top-Up SIP च्या केसमध्ये

सुरुवातीला मासिक SIP: 3000 रुपये
कार्यकाळ: 20 वर्ष
अंदाजे रिटर्न: 12 टक्के
दर 1 वर्षी Top-Up: 500 रुपये
एकूण गुंतवणूक: 18.60 लाख रुपये
20 वर्षांनंतर SIP ची व्हॅल्यू: 59.30 लाख रुपये

फायदा: 40 लाख रुपये

SIP
डेटा विश्लेषणातून पर्यटन व हाॅटेल व्यवसाय अनलाॅक करून देणारी स्टार्टअप अपस्विंग

गुंतवणूकीची व्हॅल्यू दुप्पट

कॅलक्युलेटरवर SIP आणि Top-Up SIP मध्ये 20 वर्षांनंतर गुंतवणुकीची रक्कम तब्बल दुप्पट होते आहे. Top-Up SIP मध्ये गुंतवणूक जास्त आहे पण गुंतवणुकीवर एक्चुअल रिटर्न 40 लाख रुपये आहे. जिथे रेग्युलर SIP मध्ये एक्चुअल रिटर्न 22.8 लाख रुपये इतका आहे. त्यामुळे SIP मध्ये इन्व्हेस्ट करताना Top-Up SIP चा विचार नक्की करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com