जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा 25 वर्षांनंतर घटस्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

वॉशिंन्गटन: अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी त्यांच्या पत्नी मॅकेन्झीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 'आमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबाबत मी लोकांना माहिती देऊ इच्छितो असे सांगत जेफ बेझॉस यांनी पत्नीला घटस्फोट देत असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जेफ आणि मॅकेन्झी यांना चार अपत्ये आहेत. 

मॅकेन्झीसोबत 25 वर्षाच्या संसारानंतर जेफ बेझॉस यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. जेफ बेझॉस अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे 137 अब्ज डॉलर इतकी मालमत्ता आहे. ट्विटमध्ये बेझॉस म्हणाले की,''आमचं कुटुंब आणि जवळच्या मित्रांना ज्याप्रकारे माहिती आहे की, प्रेमाने भरलेल्या एका दिर्घ काळानंतर मी आणि मॅकेन्झी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही एकमेकांचे मित्र म्हणून पुढील आयुष्य जगू.''

 जेफ बेझॉस यांनी 1994 मध्ये अॅमेझॉनची स्थापना केली होती. शिवाय मॅकेन्झी या अॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या. आता घटस्फोट झाला असला तरी आमही नवीन प्रकल्प आणि कंपनीसाठी उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र येत राहू असे सांगितले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon founder Jeff Bezos, wife divorcing after 25 years

टॅग्स