Video : मंदीची भीती वाटतेय? पुण्यात जागा असेल तर, पैसे कमवायची आहे संधी

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

पुणे: ऍमेझॉनने आज पुण्‍यामध्‍ये देशातील सर्वात मोठे डिलिव्‍हरी स्‍टेशन उभारले आहे. नवीन स्‍टेशनच्या माध्यमातून नवीन रोजगार उपलब्ध झाले असून ग्राहकांना देखील फायदा होणार आहे. ऍमेझॉनने पुणे शहरामध्‍ये डिलिव्‍हरी नेटवर्क प्रबळ करण्‍याची आणि वस्तूंच्या डिलिव्‍हरी जलद करण्‍यासाठी स्टेशन उभारले आहे. या विस्‍तारीकरणासह ऍमेझॉनचे महाराष्‍ट्रभरात सुमारे 200 मालकीचे व डिलिव्‍हरी सर्व्हिस पार्टनर स्‍टेशन्‍स आणि 3000 हून अधिक 'आय हॅव स्‍पेस' पार्टनर्स बनले आहेत.

पुणे: ऍमेझॉनने आज पुण्‍यामध्‍ये देशातील सर्वात मोठे डिलिव्‍हरी स्‍टेशन उभारले आहे. नवीन स्‍टेशनच्या माध्यमातून नवीन रोजगार उपलब्ध झाले असून ग्राहकांना देखील फायदा होणार आहे. ऍमेझॉनने पुणे शहरामध्‍ये डिलिव्‍हरी नेटवर्क प्रबळ करण्‍याची आणि वस्तूंच्या डिलिव्‍हरी जलद करण्‍यासाठी स्टेशन उभारले आहे. या विस्‍तारीकरणासह ऍमेझॉनचे महाराष्‍ट्रभरात सुमारे 200 मालकीचे व डिलिव्‍हरी सर्व्हिस पार्टनर स्‍टेशन्‍स आणि 3000 हून अधिक 'आय हॅव स्‍पेस' पार्टनर्स बनले आहेत. डिलिव्‍हरी नेटवर्कचा दुप्‍पट विकास अॅमेझॉनला महाराष्‍ट्रातील लहान नगरांमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी आणि राज्‍यातील जवळपास 900 पिन कोड्समध्‍ये प्रत्‍यक्ष डिलिव्‍हरी उपस्थिती असण्‍यासाठी मदत मिळणार आहे. या विस्‍तारीकरणामुळे महाराष्‍ट्रातील व्‍यक्‍तींसाठी हजारो रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या विस्‍तारीकरणाबाबत ऍमेझॉन इंडियाचे लास्‍ट माइल ट्रान्‍सपोर्टेशनचे संचालक प्रकाश रोचलानी यांनी माहिती दिली. 

ऍमेझॉन इंडियाचे पार्टनर होण्यासाठी: 
समजा तुमचे कुठे दुकान असेल किंवा तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर 'आय हॅव स्‍पेस' पार्टनर्सच्या माध्यमातून तुम्हाला ऍमेझॉन इंडियाचे पार्टनर होता येणार आहे. ऍमेझॉन इंडियाचे पार्टनर झाल्यानंतर तुमच्या परिसरातील लोकांना तुम्ही वस्तूंची डिलिव्हरी करू शकता. त्यानुसार तुम्हाला महिन्याला केलेल्या वस्तूंच्या डिलिव्हरीनुसार पैसे दिले जातात. शिवाय यासाठी  ऍमेझॉन इंडियाकडून तुम्हाला खास प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी कोणतेही शुल्क कंपनीकडून आकारले जाते नाही. 

गृहिणी आणि विद्यार्थ्यांना देखील संधी 
गृहिणी आणि विद्यार्थ्यांना देखील ऍमेझॉनसोबत काम करता येणार आहे.  ऍमेझॉन फ्लेक्स हे ऍप डाऊनलोड करून त्यावर तुम्ही तुमची माहिती भरून ऍमेझॉनच्या वस्तूंची अधिकृतरित्या डिलिव्हरी करू शकता. त्यामाध्यमातून गृहिणी आणि विद्यार्थ्यांना ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी ते त्यांच्या परिसरातील व्यक्तींनी ऍमेझॉनमार्फत केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amazon launches delivery station in Pune