Amazon Prime ! सबस्क्रिप्शन 500 रुपयांनी महागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon

Amazon Prime ! सबस्क्रिप्शन 500 रुपयांनी महागले

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दूरसंचार क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्या Airtel आणि Voda-Idea ने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर आता Amazon ने त्यांच्या Amazon Prime चे सबस्क्रिप्शन वाढविण्याचे जाहीर केले आहे.

नव्याने लागू होणारे दर भारतात 14 डिसेंबरपासून अंबलात येणार आहे, अशी माहिती कंपनीने त्यांच्या FAQ पेजवर ही माहिती दिली आहे. कंपनीने पेजवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “सध्या, तुम्ही प्राइममध्ये जुनी किंमत देऊन सहभागी होऊ शकता.

हेही वाचा: Amazon कडून नोकऱ्यांचा पाऊस, तब्बल 1,10,000 लोकांना देणार जॉब

अशा आहेत Amazon प्राइम सबस्क्रिप्शनच्या नवीन किमती

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्राइम मेंबरशिपची नवीन किंमत पुढीलप्रमाणे असेल: मासिक प्लॅनची ​​ऑफर किंमत 129 रुपये आहे आणि ऑफर कालावधी 13 डिसेंबरला संपल्यानंतर ही किंमत 179 रुपयांपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे, तिमाही योजनेची ऑफर किंमत 329 वरून 459 रुपयांपर्यंत वाढेल, तर 999 ची वार्षिक ऑफर किंमत 1499 रुपयांपर्यंत वाढणार आहे. किंमतींबाब तुम्ही www.amazon.in/prime ला भेट देऊ शकता.

loading image
go to top