Amazon ची ‘ही’ सेवा भारतात होणार बंद; वाचा काय आहे कारण?

ही सेवा सुरुवातीला बेंगळुरूमधील निवडक भागात सुरू करण्यात आली होती.
Amazon
Amazon Sakal

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉन आपली फूड डिलिव्हरी सेवा बंद करणार आहे. ॲमेझॉनने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना माहिती दिली की, Amazon India ने यावर्षी 29 डिसेंबर रोजी आपला फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मे 2020 मध्ये बेंगळुरू येथून फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली होती.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ॲमेझॉनने आधीच एडटेक (EdTech) सेवा बंद केली आहे. आता कंपनी जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कंपनीने रेस्टॉरंट भागीदारांना सांगितले आहे की, कंपनी सर्व व्यवसाय करार पूर्ण करेल. ॲमेझॉन फूड डिलिव्हरी सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे.

फूड डिलिव्हरी सेवा बंद करण्याबाबत ॲमेझॉनचे म्हणणे आहे की, वार्षिक ऑपरेटिंग रिव्ह्यूमध्ये फूड डिलिव्हरी सेवा आणखी वाढवता येणार नसल्याचे समोर आले आहे. कंपनीने काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर, 29 डिसेंबर 2022 पासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच, यानंतर तुम्ही Amazon Food वरून ऑर्डर करू शकणार नाही. फूड डिलिव्हरी क्षेत्रात ॲमेझॉनच्या प्रवेशामुळे स्विगी आणि झोमॅटोसह प्रस्थापित कंपन्यांनमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती.

Amazon
Pharma share: 'या' फार्मा कंपनीने गुंतवणुकदारांना बनवले कोट्यधीश; एका लाखाचे केले एक कोटी

Amazon ने मे 2020 मध्ये भारतात ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी कोविड-19 असल्यामुळे देशभरात लॉकडाऊन होता. ही सेवा सुरुवातीला बेंगळुरूमधील निवडक भागात सुरू करण्यात आली होती. मार्च 2021 मध्ये, ही सेवा बेंगळुरूच्या प्रमुख भागांमध्ये उपलब्ध होती. आता ही सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com