esakal | अमेरिकेची अर्थव्यवस्था येतेय रुळावर; जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

american economy

मागील तिमाहीतील आलेल्या आकडेवारीनुसार, व्यापार गुंतवणूक, गृहनिर्माण आणि निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था येतेय रुळावर; जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन: कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावलेली दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक व्यापारात घट झाली आहे. पण आता वर्षाच्या शेवटी जागातिक अर्थव्यवस्थेसंबंधी काही सकारात्मक संकेत आले आहेत. कारण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेमध्ये जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने 33.1 टक्के विक्रमी वाढ नोंदवली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असेल तर त्याचा अप्रत्यक्ष सकारात्मक परिणाम जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो.

मागील तिमाहीतील आलेल्या आकडेवारीनुसार, व्यापार गुंतवणूक, गृहनिर्माण आणि निर्यात क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच राज्य आणि स्थानिक सरकारी खर्च आणि ग्राहक खर्च कमी झाला आहे. ही जीडीपीतील वाढ ही 1947 नंतरच्या एका तिमाहीतील सर्वोच्च वाढ ठरली आहे. यापूर्वी 1950 मध्ये या वाढीचा दर 16.7 टक्के होता.

तिसऱ्या तिमाहीत जरी चांगली वाढ झाली असली तरी कोरोनाकाळात झालेले नुकसान अमेरिकेसाठी खूप मोठे होते. ते भरून निघणे खूप अवघड आहे. 

पण आता कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत वाढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांची संख्या पाहता तज्ज्ञांच्या मते चालू तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा वेग मंदावू शकतो.  

यापूर्वी पहिल्या तिमाहीत अमेरिकी अर्थव्यवस्था 5 टक्क्यांनी घसरली आणि दुसऱ्या तिमाहीत विक्रमी 31.4 टक्के घसरली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत विकासाचा वेग मंदावल्याबद्दल अर्थतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी पुन्हा कमी होऊ शकतो, अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top