आर्थिक साक्षरता = स्वातंत्र्य आणि स्वाभिमान

आर्थिक साक्षरता = स्वातंत्र्य आणि स्वाभिमान

स्मिता : ‘काँग्रेट्‌स’ श्रुतिका ! ‘जॉब’ मिळाला !  

श्रुतिका : ‘थॅंक यू’ !  

स्मिता : आता नेटाने काम करून, ‘करिअर’मध्ये भरपूर प्रगती कर... पण त्याच बरोबर तुझ्या कष्टाने तू जे काही पैसे कमावणार आहेस ते योग्य प्रकारे सांभाळ... बचत आणि गुंतवणूक नित्य नेमाने कर.  

श्रुतिका : अगं, ‘जॉब’मधलं माझं काम मी करेन, पण पैसे सांभाळणं काही माझं ‘डिपार्टमेंट’ नाही.  

स्मिता : असं का म्हणतेस ?  

श्रुतिका : का म्हणजे... अगं आजपर्यंत मी कधीच बचत किंवा गुंतवणुकीविषयी काहीच केलं नाहीये.

स्मिता : अगं अगदी सगळं तूच केलं पाहिजे असं काही नाही. तू एका चांगल्या ‘फायनांशियल ॲडव्हायझर’ची मदत नक्की घेऊ शकते... पण निदान या विषयातील थोडी-फार माहिती प्रत्येकाला असलीच पाहिजे.  

श्रुतिका : पण घरी बाबा आणि दादा आहे की ह्या गोष्टींची काळजी घ्यायला.  

स्मिता : आहो ‘मॅडम’, कुठल्या जमान्यात आहात आपण ? पैश्‍यांचे व्यवहार फक्त पुरुषांनीच करावेत असे काही नाही... उलट इतिहास बघितला तर कळेल की बायकाच धन सांभाळण्यात हुशार असतात.  

श्रुतिका : हो गं... खरंतर, घर हे बाईच चालवीत असते. उधळपट्टी न करता, योग्य ती काटकसर करून घरातील सर्वांचा विचार करूनच ती सर्व निर्णय घेत असते.  

स्मिता : नात्यांचा आणि पैश्‍याचा समतोल अतिशय व्यवस्थित साधते ती.  

श्रुतिका : शिवाय, अडी-अडचणींसाठी निरनिराळ्या ठिकाणी आणि डब्यांमध्ये, पै अन्‌ पै वाचवून ती भरपूर बचत करत राहते !  

स्मिता : बचत होते ही बाब चांगली आहे, पण ह्या पद्धती जुन्या आहेत... आर्थिक आणि गुंतवणूक विश्वातील प्रगतीमुळे, आता पैश्‍याच्या बचतीचे आणि गुंतवणुकीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.  

श्रुतिका : पण आता आपल्यासाठी बचतीचे आणि गुंतवणुकीचे कुठले पर्याय चांगले आहेत आणि ते कसे निवडायचे ?  

स्मिता : या साठीच प्रत्येक मुलीने / महिलेने आता स्वतःची आर्थिक साक्षरता वाढवली पाहिजे.  

श्रुतिका : म्हणजे नेमकं काय करायचं ?  

स्मिता : सोप्पी सुरुवात म्हणून निदान आपल्या घरातील पैशांबाबत होत असलेल्या चर्चेत भाग घ्यावा व आर्थिक गोष्टी समजून घ्याव्यात.  

श्रुतिका : म्हणजे हा आपला प्रांत नाही, असे म्हणायचे नाही.  

स्मिता : बरोबर. पैश्‍यांच्याबाबतीत आपल्या विचारांचा आवाका वाढवला पाहिजे... बचतीतून गुंतवणुकीकडे मार्गक्रमण हवे... आणि सोनं घेण्याच्या पलीकडे विचार झाला पाहिजे.  

श्रुतिका : ओके. आजपासूनच हा अभ्यास सुरू करते.  

स्मिता : मुलगी / महिला नुसती साक्षर नाही, तर ती आर्थिक साक्षरसुद्धा हवी. आर्थिक साक्षरता म्हणजेच खरा इंडिपेन्डेन्स.

श्रुतिका : गॉट इट ! आर्थिक साक्षरता म्हणजेच, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान !

(लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com