आनंद महिंद्रा मार्चमध्ये पद सोडणार 

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

नवी दिल्ली: महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आता 1 एप्रिल 2020  पासून अकार्यकारी अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार,  पवन कुमार गोयंका यांना व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे.  सध्या त्यांचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. त्यांनतर गोएंका यांची पुन्हा नियुक्ती करण्यात येणार असून ते पुन्हा 12 नोव्हेंबर 2020 ते 1 एप्रिल 2021 पर्यंत पदावर कायम राहतील. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या15 दिवसात बरेच वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. यामुळे सध्या कंपनीमध्ये 'रिस्ट्रक्चरिंग' काम सुरु आहे. तसेच आनंद महिंद्रा अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीच्या संचालक मंडळावर मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पडणार आहेत. 

समूहाचे धोरणात्मक अध्यक्ष असलेले (स्ट्रॅटेजी चेअरमन) अनीष शाह 1 एप्रिल 2020 पासून मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) काम बघणार आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Mahindra to step down as Group chairman from 1 April 2020