‘बर्गर किंग’नंतर अजून एक ‘आयपीओ’ बाजारात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

बिस्कीट; तसेच ब्रेड बनविणाऱ्या मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज या कंपनीचा ‘आयपीओ’ बाजारात येत आहे. ही कंपनी बेकरी प्रॉडक्टसचा पुरवठा करीत असून, बर्गर किंग, मॅकडोनाल्ड यासारख्या बड्या कंपन्यांनादेखील पुरवठा करते.

‘बर्गर किंग’नंतर अजून एक ‘आयपीओ’ बाजारात येत आहे. बिस्कीट; तसेच ब्रेड बनविणाऱ्या मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज या कंपनीचा ‘आयपीओ’ बाजारात येत आहे. ही कंपनी बेकरी प्रॉडक्टसचा पुरवठा करीत असून, बर्गर किंग, मॅकडोनाल्ड यासारख्या बड्या कंपन्यांनादेखील पुरवठा करते.

‘इंग्लिश ओव्हन’ या नावाने बेकरी प्रॉडक्ट, तर ‘क्रीमिका’ या नावाने कुकीजची विक्री करते. सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० दरम्यान कंपनीचा नफा २८२ टक्क्यांनी वाढला आहे. या ‘आयपीओ’मधून उभी केली जाणारी रक्कम कंपनीचा विस्तार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

अर्थविषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सुरू होण्याची तारीख - १५ डिसेंबर २०२०
अंतिम तारीख - १७ डिसेंबर २०२० 
किंमतपट्टा - रु. २८६ ते २८८
लॉट साइज - ५० व ५० शेअरच्या पटीत
आयपीओ साइज - रु. ५४० कोटी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another IPO is coming to market after Burger King

Tags
टॉपिकस
Topic Tags: