काय... लवकरच iphone वर बंदी येणार?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

बर्लिन: जगभरातील स्मार्टफोन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या अ‍ॅपलच्या iphone वर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरत आहे iphone मधील फोटो एडिट आणि अ‍ॅप मॅनेजमेंटसंदर्भातील पेटंट वाद. अ‍ॅपलच्या iphone साठी क्वालकॉम (Qualcomm) ही कंपनी 'चिप्स' बनवते. अ‍ॅपल आणि क्वालकॉम या दोन्ही कंपन्यांनी या चिप्सच्या तंत्रदानासाठी पेटंट मिळविण्यासाठी दावा दाखल केला आहे. चिप्सची निर्मिती कॉलकॉमची असल्याने हा निकाल त्यांच्या बाजूने जाऊन iphone वर बंदी येण्याची वेळ येऊ शकते.

बर्लिन: जगभरातील स्मार्टफोन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या अ‍ॅपलच्या iphone वर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरत आहे iphone मधील फोटो एडिट आणि अ‍ॅप मॅनेजमेंटसंदर्भातील पेटंट वाद. अ‍ॅपलच्या iphone साठी क्वालकॉम (Qualcomm) ही कंपनी 'चिप्स' बनवते. अ‍ॅपल आणि क्वालकॉम या दोन्ही कंपन्यांनी या चिप्सच्या तंत्रदानासाठी पेटंट मिळविण्यासाठी दावा दाखल केला आहे. चिप्सची निर्मिती कॉलकॉमची असल्याने हा निकाल त्यांच्या बाजूने जाऊन iphone वर बंदी येण्याची वेळ येऊ शकते. मात्र, यासाठी भारतीयांना चिंता करण्याचे काही कारण नाही कारण ही बंदी जर्मनीमध्ये येणार आहे. 

अ‍ॅपल आणि क्वालकॉम, या दोन्ही अमेरिकी कंपन्या आहेत. अ‍ॅपलने पेटंटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत गेल्या वर्षी चीनमध्ये देखील यासंदर्भात याचिका दाखल केली होती. ज्याचा निकाल क्वालकॉमच्या बाजूने लागला होता. 

आता जर्मनीतील न्यायालयाच्या म्हणण्यानुसार देखील, Qualcomm ने ठराविक रक्कम अनामत म्हणून (सिक्युरीटी डिपॉझिट) जमा केल्यास अ‍ॅपलच्या उत्पादनांवर लगेचच बंदी घालण्यात येणार आहे. ही रक्कम अ‍ॅपलला झालेला तोटा भरुन काढण्यासाठी उपयुक्त ठरेल असे न्यायालयाने सांगितले आहे. 

असे झाल्यास जर्मनीमध्ये अ‍ॅपलच्या iphone 7plus, 7, 8, 8plus आणि iphone X या फोनवर बंदी येण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple Will Not Sell iPhone 8 and iPhone 7 in German Stores