50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तुम्हाला करेल मालामाल..!

Share Market
Share MarketSakal

शेअर बाजारात गुंतवणूक करुन तुम्हाला चांगली कमाई करता येते, फक्त त्यासाठी चांगले शेअर्स निवडणे गरजेचे आहे. अशातच शेअर बाजारातील गुंतवणूकदार तुम्हाला याबाबत सल्ले देत असतात. मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी कॅश मार्कटमधून मजबूत स्टॉक निवडला आहे. तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी आर्टेमिस मेडिकेअरची (Artemis Medicare) निवड केली आहे. यात तुम्ही शॉर्ट ते लाँग टर्मसाठी पैसे गुंतवूल शकता.

Share Market
ITC Shares: मार्चमध्ये 17 टक्क्यांची वाढ, 16 महिन्यांतील उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

आर्टेमिस मेडिकेअर (Artemis Medicare) का ?
बाजार तज्ज्ञांच्या मते, आर्टेमिस मेडिकेअर (Artemis Medicare) ही एक दर्जेदार कंपनी आहे. कंपनीला गेल्या 4 महिन्यांपासून प्रचंड नफा मिळत आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीला 5.30 कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 7 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

आर्टेमिस मेडिकेअर (Artemis Medicare)
सीएमपी (CMP) - 47.80 रुपये
टारगेट (Target) - 52/53 रुपये

Share Market
भारतात होणारे 67% गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू

कंपनीचे फंडामेंटल्स ?


कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय भक्कम आहेत. कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी सुमारे 70 टक्के आहे. याशिवाय या कंपनीत केरळ सरकारचा 5 टक्के हिस्सा आहे. यात शॉर्ट टर्मसाठी गुंतवलेले पैसे तुम्हाला तगडा रिटर्न देतील असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com