'कोरोना' मे ये ना करो!

cybercrime
cybercrime
Updated on

सध्या दोन प्रकारचे व्हायरस
लोकांवर आणि समाजावर आक्रमण करत आहेत. पहिला म्हणजे कोविड-19 आणि दुसरा म्हणजे 'हॅकर' आणि 'ऑनलाईन फ्रॉड' करणारे. पहिला तुमचा जीव घेण्याच्या तयारीत आहे तर दुसरा तुमची कष्टाने कमावलेली संपत्तीच्या मागावर आहे. म्हणूनच या सर्वांवर उपाय आहे 'सोशल डिस्टंन्सिंग'चा.

 'सायबर क्राईम'चे प्रमाण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. 'ऑनलाईन फ्रॉड' विविध पद्धतीने होत असून आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगून फसवे मेल/एसएमएस/व्हॉट्सअॅप मेसेज ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. दोन्ही व्हायरसपासून स्वतःचा बचाव करणे आपल्याच हातात आहे. 

गेल्या काही दिवसात प्रामुख्याने खालील प्रकारे फसवणूक होत असल्याचे आढळून आले आहे.

मेसेज किंवा मेलच्या माध्यमातून
लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहात? मग, पंतप्रधान बेCybercrime has grown in the last few days : लोकांवर आणि समाजावर आक्रमण करत आहेत. पहिला म्हणजे कोविड-19 आणि दुसरा म्हणजे 'हॅकर' आणि 'ऑनलाईन फ्रॉड' करणारे. रोजगार योजना :  18 ते 40 वयोगटातील बेरोजगार व्यक्तीस दरमहा 3500 रुपये इतका बेरोजगार भत्ता मिळेल त्यासाठी पुढील लिंक वर नोंदणी करा 
(http://bit.ly/pradhanmantri-berojgar-bhatta-yojnna) 

2)लॉकडाऊन कालावधी दोन महिन्यांसाठी मोफत नेटफ्लिक्स, अमॅझॉन, हॉटस्टार देऊ करण्याचे आमिष दाखवून किंवा जिओ/ एअरटेलसारख्या कंपनीकडून मोफत रिचार्ज करण्यासाठी एखादी लिंक मेल अथवा एसएमएसने पाठविली जाते.

3) तातडीचे आर्थिक साह्य हवे आहे? असे सांगत आपले 50 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर झाले असून कर्ज रक्कम आपल्या खात्यात त्वरित जमा होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
(http://bit.ly/3a73KIP)

4)लॉकडाऊनच्या काळात आपण घरातच राहणार आहात म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे 60 जीबी मोफत इंटरनेट मोफत मिळविण्यासाठी खालील लिंक क्लिक करा (http://corona-gov.in?60gb)

अशा प्रकारच्या लिंक मेल किंवा एसएमएसद्वारे पाठविली जातात. नागरिक आमिषाला बळी पडत लिंकवर स्वतःहून नोंदणी करत सर्व माहिती (नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील, पॅन व आधार कार्ड नंबर) देतात. फसवणूक करणारे या माहितीचा वापर करू आपल्या बँक खात्यातील पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळवुन ऑनलाईन फसवणूक करतात.

फोनकरून फसवणूक:
सध्या कोरोनाची भीती दाखवून आपली 'लाईफ इन्शुरन्स पॉलिसी' संपली असून त्वरित प्रीमियमची रक्कम भरल्यास दंड माफ केला जाऊन पॉलिसीचे नुतनीकरण केले जाईल अशा आशयाचा फोन 'आयआरडीए'मधून केला आहे,असे भासविले जाते.  प्रीमियम भरण्यासाठी  इन्शुरन्स कंपनीचे नाव असलेले बनावट बँक खाते दिले जाते. सद्यस्थितीत पॉलिसी खंडीत होऊन चालणार नाही म्हणून दिलेल्या खात्यात ऑनलाईन प्रीमियम पेमेंट करा असे सांगितले जाते. मात्र अशा पद्धतीने कोणतीही इन्शुरन्स कंपनी किंवा 'आयआरडीए' प्रीमियमची मागणी करीत नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

'पीएम केअर्स'मध्ये निधी देताना
पंतप्रधानांच्या 'सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंडा'त (पीएम केअर्स) फंडात 'युपीआय'द्वारे पेमेंट करता यावे यासाठी pmcares@sbi हा 'युपीआय आयडी' दिलेला आहे. मात्र काहींनी तसाच बनावट 'युपीआय आयडी' तयार केला आहे. नागरिकांना बनावट आयडी मेसेज करून निधी देण्यास सांगितले जाते मात्र प्रत्यक्ष पीएमकेअर्स फंडात जमा न होता फसवणूक करणाऱ्यांकडे जातो.

ईएमआय माफ करून देण्यासाठी फोन

1) बँकांनी तीन महिन्यांचे 'ईएमआय' स्थगित करण्याचा  पर्याय ग्राहकांना देऊ केला आहे. मात्र आपण बँकेतून बोलत असल्याचे भासवून तुम्हाला 'ईएमआय' स्थगित करायचे आहेत का? अशी विचारणा केली जाते. ग्राहकाकडून बँक खात्याचा तपशील मागितला जातो. शिवाय मोबाईलवर 'वन टाईम पासवर्ड' (ओटीपी) पाठवला जातो. तो फोनवर सांगा असे सांगून ग्राहकाच्या खात्यातून पैसे लांबविले जातात. मात्र आलेला 'ओटीपी' कोणालाही सांगू नका. कोणतीही बँक अशा प्रकारे ग्राहकाला फोन करून 
'ओटीपी'ची मागणी करत नाही.

2) अॅपद्वारे फसवणूक:
फसवणूक करणारे बँकेच्या खातेदाराल 'ईएमआय' स्थगित करायचे आहेत का? अशी विचारणा करून 'एसएमएस'द्वारे 
अॅपची लिंक पाठवतात. ते डाऊनलोड करायला सांगतात. मात्र असे बनावट 
अॅप डाऊनलोड केल्यास 'हॅकर' कॉम्पुटर किंवा मोबाईलमधील सर्व महत्त्वाची माहिती 'हॅक' करू शकतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म:
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण बऱ्याचदा 'स्टेटस', फोटो अपलोड करत असतो. मात्र फसवणूक करणारे अशी माहिती बघून तुम्हाला 'फोन' करू शकतात. फोनकरून तुमच्या बँकेतून बोलतोय असे सांगून तुम्हाला तुमच्याविषयी काही अचूक माहिती देतात. त्यामुळे तुम्ही त्यावर विश्वास ठेवतात. मग बँक खात्याचा तपशील वगैरे मागितला जाऊन तुम्हाला फसविले जाते. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सांभाळून करा. वैयक्तिक माहिती त्यावर 'शेअर' करू नका.

वरील सर्व प्रकारावरून आपल्या असे लक्षात येईल कोरोनामुळे निर्माण झालेल्या  परिस्थितीचा गैरफायदा घेऊन फसवणूक होऊ शकते व ती टाळणे आपल्याच हातात आहे. 

लेखक सर्टिफाईड फायगनान्शियल  प्लॅनर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com