esakal | ‘रॉयल एन्फिल्ड’च्या बाइक्स म्हणजे तरुणाईच्या हृदयाची धडकन्
sakal

बोलून बातमी शोधा

Royal-Enfield-350-bullets

‘रॉयल एन्फिल्ड’ची बाइक!! आवाजानं हृदयात धडकी भरायला लावणारी आणि शानदार अशी ही रॉयल एन्फिल्ड. आता असं दृश्य असेल, तर काय मंडळी. स्वर्गच नाही का? आणि किती तरी फॅन्स तयार होणार तुमचे. बरोबर ना? 

‘रॉयल एन्फिल्ड’च्या बाइक्स म्हणजे तरुणाईच्या हृदयाची धडकन्

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मस्त रस्ता आहे. तुम्ही जॅकेट, जीन्स, स्पोर्ट्स शूज अशा पेहरावात आहात. तुमचा मूड उत्तम आहे आणि स्पीड जोरदार आहे....आणि हो, तुम्ही बसलाय एका खास बाइकवर. जिचा आवाज खूप लांबवरूनसुद्धा ऐकू येतो आणि जिचं रूप समोरच्याचं लक्ष वेधून घेतं अशी बाइक. येस्स. ‘रॉयल एन्फिल्ड’ची बाइक!! आवाजानं हृदयात धडकी भरायला लावणारी आणि शानदार अशी ही रॉयल एन्फिल्ड. आता असं दृश्य असेल, तर काय मंडळी. स्वर्गच नाही का? आणि किती तरी फॅन्स तयार होणार तुमचे. बरोबर ना? 

बाइकचे नाव-  रॉयल एन्फिल्ड ३५० बुलेट 
डिस्प्लेसमेंट (इंजिन) ३४६ सीसी 
वजन १९१ किलो 
गिअर्स पाच मॅन्युअल गिअर्स 
ब्रेक अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टिम 
रंग ब्लॅक (केएस), जेट ब्लॅक, रॉयल ब्लू, रिगल रेड, बुलेट सिल्व्हर, ओनिक्स ब्लॅक, फॉरेस्ट ग्रीन (स्टँडर्ड) 
एमिशन बीएस ६ 
इंधन टाकी क्षमता १३.५ लीटर 
किंमत १,३९,००० रुपये (एक्स-शोरूम, पुणे) 

‘रॉयल एन्फिल्ड’च्या बाइक्स म्हणजे तरुणाईच्या हृदयाची धडकन्. या ‘रॉयल एन्फिल्ड’ची अनेक मॉडेल्स तरुणाईला लुभवतात. कंपनीची अनेक मॉडेल्स आहेत. ‘इंटरसेप्टर’, ‘क्लासिक’, ‘कॉंटिनेंटल जीटी’, ‘हिमालयन’ आणि ‘बुलेट’ अशी मॉडेल्स त्या त्या वयोगटानुसार किंवा मागणीनुसार लोकप्रिय आहेत. या प्रत्येक मॉडेलमधल्या वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्सच्या बाइक्स पुन्हा वेगळ्या आहेत. म्हणजे क्लासिकमध्ये क्लासिक ३५० सिंगल चॅनेल, क्लासिक ३५० ड्युएल चॅनेल असे प्रकार असतात. सच्चा बाइकप्रेमी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि स्वतःची क्रेझ नक्की काय आहे ते ओळखून बाइकची निवड करतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात ब्रँड्स खूप असले, तरी सर्वाधिक चर्चेची बाइक असते ती म्हणजे ‘बुलेट.’ दोस्तहो, ही बाइक का विशेष आहे ते तुम्हाला माहीत आहे? जगभरात बाइक्सच्या इतिहासात सर्वाधिक काळ प्रॉडक्शन होणारी ही बाइक आहे. हेच या बाइकचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बघा, अनेक वर्षं झाली, तरी या ‘बुलेट’वरचं तिच्या चाहत्यांचं प्रेम कायम आहे. बुलेटचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन सरकारनं सीमेच्या सुरक्षिततेसाठी या बुलेटची निवड केली होती आणि आठशे बाइक्सची ऑर्डर दिली होती. नंतर भारतातच या बाइकचं उत्पादन सुरू झालं आणि ही बाइक इथल्या मातीची ओळख बनली. अजूनही बुलेटचं नाव उच्चारलं, तरी तरुण क्रेझी बनतात. बुलेटचं दणकेबाज इंजिन, तिचा ‘मॅचो लपक’ आणि मुख्य म्हणजे दणकटपणा ही तिची जनमानसात रुजलेली ओळख या गोष्टींमुळे बुलेटची लोकप्रियता कायम आहे. किंमत जास्त असली, तरी तरुण वर्गाची पसंती तिलाच असते हे त्याचं कारण. इतक्या काळात अनेक बाइक्समध्ये बदल झाले; पण बुलेटची क्रेझ कायम आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा