तुम्ही 'टर्म इन्शुरन्स' घेतलाय का?

दिलीप बार्शीकर
Monday, 13 April 2020

कमावती व्यक्ती असेल तर आर्थिक पोकळीमुळे संपूर्ण कुटुंबाची प्रचंड वाताहत होऊ शकते मात्र इथे कुटुंबाच्या मदतीला धावून येते ती आयुर्विमा पॉलिसी.  

मृत्यू प्रत्येकाच्या आयुष्यातील एक निश्चित गोष्ट आहे हे मान्य. मात्र याच मृत्यूने जर एखाद्याला अचानकपणे गाठले तर ते कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होऊ शकते. ही अनिश्चितता किती दाहक असू शकते याचा अनुभव कोविड-19 च्या रूपाने आज सारे जग घेत आहे. यामुळे आयुर्विम्याचे महत्त्व अधोरेखित होते आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे आकस्मिक मृत्युमुळे त्या कुटुंबाचे जे अपरिमित नुकसान होते. कमावती व्यक्ती असेल तर आर्थिक पोकळीमुळे संपूर्ण कुटुंबाची प्रचंड वाताहत होऊ शकते मात्र इथे कुटुंबाच्या मदतीला धावून येते ती आयुर्विमा पॉलिसी.

आता ही विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आपले विमा संरक्षणही भक्कम असणे आवश्यक आहे. त्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10 ते 12 पट रकमेचा विमा घेणे आवश्यक आहे. म्हणजेच समजा एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार  40 हजार असेल तर त्याने किमान 50 लाख रुपये इतक्या रकमेचा विमा घेणे आवश्यक आहे. अशा मोठ्या रकमेचा विमा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सर्वोत्तम विमा पॉलिसी म्हणजे 'टर्म इन्शुरन्स'.

टर्म इन्शुरन्स विषयी
1. टर्म इन्शुरन्स ही  गुंतवणूकीची योजना नव्हे तर अत्यल्प हप्त्यामध्ये (प्रीमियम) भरघोस संरक्षण देणारी शुद्ध विमा योजना आहे.

2.  पॉलिसीच्या कालावधीत विमेदाराचा मृत्यू  झाल्यास संपूर्ण विमा रक्कम वारसास मिळते. मुदतपूर्तीच्या वेळी विमेदार हयात असेल तर मात्र कोणतीही रक्कम देय होत नाही.

3. विम्याचा प्रीमियम हा विमेदाराचे वय, आरोग्य, सवयी, कौटुंबिक इतिहास, पॉलिसीचा कालावधी अशा अनेक गोष्टीवर अवलंबून असतो. शिवाय प्रत्येक कंपनीचे प्रीमियम दरही वेगवेगळे असतात. तरी सुद्धा सर्वसाधारणपणे वार्षिक 5 ते 6 हजार रुपये म्हणजे  दररोज 12 ते 15 रुपये (एक कप चहाची किंमत) इतक्या अल्प पप्रीमियममध्ये 50 लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो.

4. अन्य पॉलिसींप्रमाणेच टर्म इन्शुरन्ससाठी भरलेल्या प्रीमियमवर  प्राप्तिकर कायद्याच्या कलम '80 सी'नुसार सूट मिळते आणि  'क्लेम'ची संपूर्ण रक्कम  कलम 10 (10 डी) नुसार करमुक्त असते.

5. गृहकर्ज मंजूर करताना बरेच वेळा वित्तीय संस्था टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा आग्रह धरतात. अशावेळी पॉलिसी असेल तर कर्ज लवकर मंजूर होऊ शकते. शिवाय दुर्दैवाने विमेदाराचा मृत्यू  झाला तर 'क्लेम'च्या रकमेतून उर्वरित कर्ज वजा होऊन घर सुरक्षित राहते.

6. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम वेळेवर भरणे अत्यंत महत्वाचे असते. न भरल्यास विमा संरक्षण त्वरित संपुष्टात येते.

7. दोन/ चार लाखांचे दागिने सुरक्षित रहावेत म्हणून आपण वर्षाला तीन/चार हजार रुपये लॉकर भाडे देतो. मग त्या दागिन्यांच्या तुलनेने कितीतरी अधिक मौल्यवान असणाऱ्या कमावत्या व्यक्तीला जवळपास त्याच किमतीत मिळणारे भरघोस विमा संरक्षण आपण नको का द्यायला?

8. चालू महिन्यात टर्म इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये 15 ते 40 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. असे संकेत काही खाजगी विमा कंपन्यांनी दिले आहेत. 

 घरबसल्या घ्या टर्म इन्शुरन्स

तुम्हाला टर्म इन्शुरन्सबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची आहे? मग काळजी कशाला करता...'सकाळ मनी' आहे ना. 73508 73508 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. 'सकाळ मनी'चा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधून आपल्याला संपूर्ण माहिती देईल. आजकाल घरबसल्या कोणत्याही 'मेडिकल टेस्ट' न करता देखील 'ऑनलाईन' माध्यमातून टर्म इन्शुरन्स घेणे शक्य आहे.

सध्या जीवनातील वाढती अनिश्चितता आपण अनुभवतोय आणि या परीस्थितीचा सामना करण्यासाठी टर्म इन्शुरन्सचे संरक्षक कवच लवकरात लवकर मिळविणे नक्कीच श्रेयस्कर आहे.

लेखक निवृत्त विमा अधिकारी आणि प्रशिक्षण सल्लागार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about term insurance

Tags
टॉपिकस
Topic Tags: