सगळीकडे लॉकडाउन मग गुंतवणूक कुठे करावी? 

भूषण गोडबोले, सीए
Monday, 13 April 2020

जगभरातील 'कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांच्या मनात देखील लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून कुठे,कशी आणि किती गुंतवणूक करावी हा प्रश्न उभा राहिला आहे.

जगभरातील 'कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांच्या मनात देखील लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असून कुठे, कशी आणि किती गुंतवणूक करावी हा प्रश्न उभा राहिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन महिन्यात मोठी पडझड दर्शविल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने एप्रिल महिन्यात 7 हजार 511 या पातळीचा आधार घेत 9 हजार 111 या पातळीपर्यंत 'बाउन्स बॅक' केलेला दिसत आहे, अशा वेळेस 'बुरे दिन बीत गये' म्हणत बाजाराने 'बॉटम' तयार केला असे मानून जोमाने खरेदीला लागावे का? गेली दोन वर्षे शेअर बाजाराचे मुल्याकंन म्हणजेच निफ्टीचा प्राईस अर्निंग रेशो (पीई) 25 पेक्षा जास्त असल्याने शेअर बाजार महाग असल्याचे दिसत होते. मात्र गेल्या दोन महिन्यात मोठी पडझड झाल्याने सध्यस्थितीत निफ्टीचा 'पीई' 20 आहे. म्हणजेच, आता बाजाराचे मुल्याकंन मध्यम आहे.

शेअर बाजारात शेअरची  किंमत ही प्रामुख्याने कंपनीच्या आगामी काळातील उत्पन्नावर अवलंबून असते. सध्या कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउनची परिस्थिती आहे. यामुळे अनेक  कंपन्यांची 'टॉप लाईन' म्हणजेच विक्री सुरू नसल्यामुळे कंपनीची 'बॉटम लाईन' म्हणजेच नफा मिळणे देखील बंद आहे. परिणामी येत्या काळात अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल समाधानकारक राहण्याची शक्यता नसल्याने बहुतांश शेअरच्या किंमतीत देखील घसरण झाली आहे.

मात्र लॉकडाउनच्या परिस्थितीत देखील काही कंपन्या अशा आहेत की, ज्यांच्या उत्पादनांची विक्री सुरू असून त्यात वाढ झाली आहे. त्यांची विक्री सुरू असल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. उदा. फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी सेक्टर). ज्या 'एफएमसीजी' कंपन्यांकडे स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याची क्षमता आहे. उत्पादन आणि नफ्यात सतत वाढ होत आहे. गुंतवणूकदारांनी अशा कंपन्या हेरून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

दिर्घकालावधीसाठी म्हणजेच
5 ते 10 वर्षांसाठी गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवून  'पिरॅमिड' पद्धतीने गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. 'पिरॅमिड' म्हणजेच ज्यावेळी बाजाराचे मूल्यांकन महाग असेल तेव्हा तेथे कमी गुंतवणूक करणे आणि जेव्हा बाजाराचे मूल्यांकन स्वस्त असेल तेव्हा गुंतवणूक वाढवणे. थोडक्यात, बाजाराच्या मूल्यांकनानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे. बिस्कीट क्षेत्रातील दिग्गज कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज, साबण बनवणारी गोदरेज कन्झ्युमर कंपनी, पॅराशूट हेअर ऑइलची निर्मिती करणारी मॅरिको या कंपन्यांच्या शेअरमध्ये बाजार मूल्यांकनानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास दिर्घकाळात उत्तम नफा मिळू शकेल.

(डिस्क्लेमर: लेखकाने त्यांच्या अभ्यासावरून वरील मत व्यक्त केले. त्याच्याशी सकाळ सहमत असेलच असे नाही. गुंतवणूकदरांनी स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणुकीचे निर्णय घेणे अपेक्षित आहे.)

(लेखक सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about where to invesment in lockdown