कमी खर्चिक डिमॅट अकाऊंट

BSDA.
BSDA.

सध्याच्या आर्थिक चणचणीच्या काळात पैशांची बचत देखील वाढवायला हवी. आपण करत असलेल्या असंख्य व्यवहारांमधून आपण थोडे थोडे पैसे नक्कीच वाचवू शकतो. म्हणतात ना ‘मनी सेव्हड, इज मनी अर्नड’. सिक्‍युरिटीज एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) लहान गुंतवणूकदारांना ‘डीमॅट’ अकाऊंटच रूपांतर ‘बेसिक सर्व्हिसेस डिमॅट अकाऊंट’ (बीएसडीए) मध्ये करण्याची सवलत अनेक वर्षांपासून दिलेली आहे. मात्र ती बऱ्याच जणांना माहिती नसल्याने जास्तीचे शुल्क सोसावे लागते. ‘आयपीओ’च्या माध्यमातून शेअर मिळण्याची शक्‍यता वाढावी म्हणून अनेक गुंतवणूकदार कुटुंबियांच्या नावे ‘डीमॅट’ खाती उघडतात व नंतर ती तशीच पडून राहतात व चार्जेस सुरूच.  सध्याच्या आर्थिक आणीबाणीच्या काळात ‘बीएसडीए’बद्दल माहिती करून घेणे छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताचे ठरेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

‘बीएसडीए’बद्दलचे ठळक मुद्दे
1) तुम्ही लहान गुंतवणूकदार असाल (म्हणजे ‘डीमॅट’ स्वरूपातील गुंतवणूक दोन लाख रुपयांच्या आत असेल) तर तुम्ही नवीन ‘बीएसडीए’ सुरू करू शकता.

2) आपल्या ‘डिपॉझिटरी पार्टीसिपंट’ने आपले खाते आतापर्यंत ‘बीएसडीए’त रुपांतरीत केले नसल्यास तसा तुम्ही अर्ज करू शकता.

3) पुढील ‘बिलिंग सायकल’पासून तुमच्या नॉर्मल डीमॅट खात्याचे रूपांतर (अटी पूर्ण होत असल्यास) ‘बीएसडीए’ खात्यात करण्यात येईल व ‘अकाऊंट मेंटेनन्स चार्जेस’ खूपच कमी होतील.

4) सर्वसामान्यतः वार्षिक ‘अकाऊंट मेंटेनन्स चार्जेस’ तीनशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत असतात. परंतु ‘बीएसडीए’ खात्याचे चार्जेस शून्य रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत इतके कमी असतात. 

5) तुमच्या खात्यात जमा असलेल्या शेअर, बॉण्ड्‌स, डिबेंचर्सच्या मूल्यावर हे चार्जेस अवलंबून असतात.

6) शेअरचे मूल्य ५० हजार रुपयांच्या आत व ‘बॉण्ड्‌स/डिबेंचर्स’चे मूल्य एक लाख रुपयांच्या आत असल्यास शून्य चार्जेस व दोन लाख रुपयांच्या आत असल्यास केवळ शंभर रुपये चार्जेस भरावे लागतात.

7) मूल्य दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास नॉर्मल चार्जेस असतात. 

8) ‘एनएसडीएल’ व ‘सीडीएसएल’ मिळून तुमचे एकच ‘बीएसडीए’ खाते असू शकते. 

9) तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल द्यावा लागतो म्हणजे तुम्हाला ‘डेबिट अलर्ट’ व ‘ई-स्टेटमेंट’ मिळू शकते.

चला तर, जास्तीतजास्त लहान गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सहभागी व्हावे व त्यांना खर्चही कमी यावा या दुहेरी हेतूने ‘सेबी’ने दिलेल्या या सवलतींचा लाभ घेऊयात.

(लेखक निवृत्त बॅंक अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com