तातडीने पैसे हवे आहेत?  झटपट मिळणारे वैयक्तिक कर्ज असू शकते याचे उत्तर 

Article on Bajaj finance instant personal loan  for your emergency
Article on Bajaj finance instant personal loan for your emergency

महासाथीमुळे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण झाले आहेत आणि बहुतांश लोकांना आर्थिक झळ पोहोचली आहे.  रोख रकमेची चणचण भासत असल्याने, आपण बचत केलेल्या किंवा गुंतवणूक केलेल्या पैशांना हात लावणे हे स्वाभाविकच असले तरी दरवेळी ते शक्य असेलच असे नाही.  अशा वेळी विश्वासू ठिकाणाहून घेतलेले वैयक्तिक कर्ज मदतीला येते. 

विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी वैयक्तिक कर्ज हे कशाप्रकारे उपयोगी ठरू शकते हे जाणून घेण्यापूर्वी वैयक्तिक कर्ज म्हणजे काय आणि ते कशारितीने काम करते हे आपण समजून घेऊ. 

वैयक्तिक कर्ज- सुलभ उपाय? 

बहुतांश कर्ज देणाऱ्या बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज (एनबीएफसीज) असुरक्षित कर्जाच्या नावावर वैयक्तिक कर्ज देऊ करतात.  आपल्याला जे पैसे उधार घ्यायचे आहेत त्याबदल्यात आपल्याला कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही असा याचा अर्थ असतो.  यामुळेच सध्या वैयक्तिक कर्ज हे जास्त लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.  इतर सुरक्षित कर्जापेक्षा वैयक्तिक कर्ज हे जास्त झटपट आणि सुलभतेने घेता येते. 

अर्ज केल्यापासून ते कर्जाचे वितरण होण्यासाठी त्यामानाने कमी वेळ लागतो, तुमचे निरनिराळे नियोजित आणि आकस्मिक खर्च आणि विशेषत: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला निधी उपलब्ध होतो. यातील कागदपत्रांचे काम अतिशय सुलभ असून या प्रक्रियेत बिलंब होण्याची शक्यता अगदी नगण्य असते. 

या खेरीज, तुम्हाला झटपट वैयक्तिक कर्ज देखील मिळू शकते- यात तुम्हाला हवी असलेली रक्कम काही मिनिटांत मान्य केली जाते आणि त्या रकमेचे वितरणही अगदी विक्रमी वेळात केले जाते. तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील अशी वैयक्तिक कर्जातील काही खास वैशिष्ट्ये-

1.  तारण नसलेले वैयक्तिक कर्ज

या आधीच म्हटल्याप्रमाणे, वैयक्तिक कर्जासाठी कर्ज देणाऱ्या संस्थेकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून ठेवावी लागत नाही. यामुळे कागदपत्रे तयार करण्यासाठी लागणारा आणि तुमचा अर्ज मान्य करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो

2. वैयक्तिक कर्जात बहुतांश वेळा कागदपत्रांची गरज नसते. 

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, सध्या कोणत्याही प्रत्यक्ष कागदपत्रांशिवाय वैयक्तिक कर्ज घेणे शक्य झाले आहे. तुमच्या कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपीज ऑनलाईन पाठवता येतात आणि जर तुम्ही बजाज फिनसर्वसारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून वैयक्तिक कर्ज घेत असलात आणि त्यांचे ग्राहक असलात तर तुम्हाला हे करण्याची देखील गरज नसते. तुम्ही केवळ तुमची आधीच मान्य झालेली ऑफर काही मिनिटांत बघू शकता आणि काही साध्या प्रकाराने तुम्हाला हवे असणारे पैसे मिळवू शकता. 

3. या कर्जाचे वितरण कोणत्याही प्रकारच्या अडचणींशिवाय ताबडतोब होते

Bajaj Finserv Personal Loan (बजाज फिनसर्व पर्सनल लोन) ला मंजुरी मिळाल्यानंतर, तुम्हाला अतिशय जलद गतीने त्याचे वितरण केले जाते. नवीन ग्राहकांना वैयक्तिक कर्जाची रक्कम 24 तासांच्या आत हस्तांतरित केली जाते, ऑफर्स आधीच मंजूर झालेल्या धारकांच्या बँक खात्यात तर 20 मिनिटांत रक्कम जमा होते.  हे सगळे तुम्ही तुमच्या घरात किंवा कार्यालयात आरामात बसून करू शकता. 

4. वैयक्तिक कर्जावरील परतफेडीचा कालावधी हा अतिशय सोयीस्कर असा असतो

निकडीच्या वेळी ताबडतोब पैसे मिळणे हा एक भाग झाला, पण कर्जाची परतफेड करण्यासाठी जो कालावधी दिला जातो त्यातही वैयक्तिक कर्जात काही विशेष सुविधा असतात.  उदाहरणच द्यायचे झाले तर, बजाज फिनसर्वमध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी जास्त जास्त 60 महिन्यांचा कालावधी देण्यात येतो.   या सोबतच, यातील फ्लेक्सी हायब्रीड सुविधा या वैशिष्ट्यामुळे तर तुमचा ईएमआय (समान मासिक हप्ता) 45%* पर्यंत कमी होऊ शकतो. 

कर्जाच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला केवळ व्याजाची रक्कमच ईएमआय म्हणून देण्याचा पर्याय दिला जात असल्याने हे शक्य झाले आहे.  तुमच्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज न आकारता तुम्ही कर्जाची जी रक्कम सक्रीयपणे वापरत आहात, त्यावरच व्याजाची रक्कम आकारली जात असल्याने तुमची देय रक्कम कमी होते.  तुमच्या एकूण मंजूर निधीतून तुम्हाला हवे असलेले जास्तीचे पैसे तुम्ही काढू शकता आणि जेव्हा तुम्हाला ते परत करणे शक्य होईल तेव्हा तितकेच पैसे परतही करू शकता.

याव्यतिरिक्त, तुम्ही calculate personal loan EMI या ऑनलाईन वैयक्तिक कर्ज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वीच तुम्ही तुमचा मासिक खर्च तपासून बघू शकता.  या साधनाचा उपयोग करून, तुम्हाला हव्या असलेल्या कर्ज रकमेच्या परतफेडीचा कालवधी आणि अगदी सहजपणे परवडू शकेल अशा ईएमआयचे नियोजन करणे शक्य होते आणि तुमचे आर्थिक अंदाजपत्रक तुम्ही आधीच करून ठेवू शकता. 

थोडक्यात

गरजेच्या प्रसंगात किंवा अगदी नियोजित खर्चांच्या वेळी, वित्तपुरवठा स्रोत म्हणून वैयक्तिक कर्ज हा सर्वात सोपा मार्ग ठरू शकतो.  तुमच्या बचतीला हात न लावता अगदी सोप्या रीतीने ऑनलाईन अर्ज भरून, तुम्हाला हवी असणारी रक्कम तुम्हाला मिळू शकते.   

तुमच्या वैयक्तिक कर्जावरील परवडणाऱ्या अटी आणि विनाकटकटीचा पैसे उधार घेण्याचा अनुभव हवा असेल तर तुम्ही कर्ज देऊ करणाऱ्या योग्य संस्थेची निवड करणे हे सर्वात महत्त्वाचे असते. बजाज फिनसर्व ही देशातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण अशी नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक कंपनी आहे. कंपनी वैयक्तिक कर्जावर अतिशय आकर्षक वैशिष्ट्ये देऊ करते शिवाय त्यांची कर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि विनाकटकटीची आहे.

25 लाख रुपयांपर्यतचे कर्ज घ्या आणि 60 महिन्यांपर्यंतच्या सोईस्कर कालावधीत कर्जाची परतफेड करा.  पात्र ग्राहकांना 100% डिजिटल प्रक्रीयेचा लाभ घेता येऊ शकतो आणि बँकेच्या शाखेत न जाता घरबसल्या कर्ज मिळवता येऊ शकते. 

मग, आता कसली वाट बघताय?  आजच तुमची आधीच मंजूर झालेली वैयक्तिक कर्जाची ऑफर बघा आणि काही मिनिटांमध्ये झटपट वैयक्तिक कर्ज मिळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com