गुंतवणूकदारांनी सध्या काय करावे? 

debt-equity
debt-equity

गरजा आणि जोखीम क्षमता ओळखून "ऍसेट ऍलोकेशन' करून गुंतवणूक करण्याचे तंत्र जे अवलंबतात, ते बाजाराच्या कोणत्याही स्थितीचा मुकाबला करू शकतात. "कोविड 19'च्या साथीमुळे सर्व जगाचे व्यवहार ठप्प झाले आणि जागतिक आर्थिक मंदीचे वातावरण आल्याने मार्च महिन्यात सर्व शेअर बाजार कोसळले आणि नंतर सावरले. 

परंतु, अनिश्‍चितता एवढी आहे, की आता आर्थिक प्रगती कधी आणि किती होणार, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. आजपर्यंत देशावर आणि बाजारांवर आलेल्या अनेक प्रकारच्या संकटांवर मात करून आर्थिक विकास झालेला आहे. यामुळे सध्याचे भीषण संकट दूर करण्याची क्षमता मानवी समूहात असल्याने सध्याचे संकट ही गुंतवणूक करण्याची संधी आहे, असे मानणे हे फायद्याचे ठरू शकते. 

इक्विटी फंडापेक्षा मुदत ठेवीत पैसे ठेवल्यास नुकसान झाले नसते, असे वाटणे म्हणजे "ऍसेट ऍलोकेशन'चे तत्त्व न समजणे होय. इक्विटी या वाढ देणाऱ्या ऍसेट प्रकारात तोटा होऊ शकतो आणि त्यात दीर्घकाळासाठी नियमित गुंतवणूक करावी लागते, हे तत्त्व आचरणात आणायला हवे. ठेवी का इक्विटी असा प्रश्न न विचारता त्यांचे प्रमाण किती असावे, हे ठरवावे. 

गेल्या दोन-तीन वर्षांत गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले असले तरी अजून इक्विटी फंडात गुंतवणूक करावी का, "एसआयपी' बंद करावी का, तुम्ही ठरविलेली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी इक्विटी ऍलोकेशन केले असेल, त्यानुसार गुंतवणूक चालू ठेवणे तुमच्या हिताचे आहे. 

रस्त्यावर हिरवा दिवा म्हणजे पुढे जाणे आणि लाल दिवा म्हणजे थांबणे हे अपेक्षित असते. तसेच बाजाराचे मूल्यांकन मागील सरासरीच्या तुलनेत योग्य वाटत असल्यास गुंतवणुकीसाठी हिरवा दिवा लागला, असे समजावे. अशा प्रतिकूल परिस्थितीत म्युच्युअल फंडांच्या "एनएव्ही' कमी झाल्यामुळे खरेदी केली तर जास्त युनिट्‌स मिळतील. 

जास्त मुदत = जास्त जोखीम क्षमता, या तत्त्वानुसार साधारणपणे पुढीलप्रमाणे गुंतवणूक इक्विटी/हायब्रीड योजनांमध्ये करता येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी "एसआयपी' किंवा "एसटीपी'द्वारे (3 ते 6 महिने) केल्यास जोखीम कमी होते. 
- मुदत ठेवींवरील व्याजदर कमी होत असल्याने प्राप्तिकर भरणाऱ्यांनी डेट योजनांचा जरूर विचार करावा. अल्ट्रा शॉर्ट/ शॉर्ट टर्म किंवा इक्विटी आर्बिट्राज योजनांमध्ये मुदत ठेवींपेक्षा जास्त करोत्तर परतावा मिळू शकेल. पण योजनेचा प्रकार आणि म्युच्युअल फंड कंपनी याबाबत नीट माहिती घेतली पाहिजे. 
- ज्यांना बाजाराच्या अनिश्‍चिततेची भीती वाटते, त्यांनी डेट व इक्विटीचे प्रमाण बाजाराच्या मूल्यांकनानुसार ठरविणाऱ्या "ऍसेट ऍलोकेशन' योजनांचा विचार करावा. 
- जून महिन्यातील "जीएसटी'ची जमा, मार्केट कॅप-जीडीपी प्रमाण, लॉकडाऊन शिथिल होण्याची हालचाल, अशा अनेक घटकांचा विचार करता हा काळसुद्धा गुंतवणुकीस अनुकूल वाटतो. मात्र, त्यासाठी म्युच्युअल फंडातील तुम्हाला योग्य असणाऱ्या गुंतवणूक प्रकारात नियमितपणे गुंतवणूक करणे जरुरीचे आहे. 

(लेखक ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com