esakal | भारताचा विकासदर मंदावणार:एडीबी
sakal

बोलून बातमी शोधा

Asian Development Bank cuts India growth forecast to 5.1 percent

भारताचा विकासदर मंदावणार:एडीबी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जागतिक पातळीवरील आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताचा चालू वर्षाचा विकासदराचा अंदाज 5.1 टक्क्यापर्यंत घटवला आहे. अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि वाढत्या बेरोजगारीमुळे अर्थव्यवस्थेची वाढ खुंटेल, असे भाकीत एडीबी केले आहे. बँकेने चालू वर्ष आणि आगामी आर्थिक वर्षाचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्था मुडीज, तसेच रिझर्व्ह बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील विकासदर मंदावण्याचे संकेत आधीच दिले आहेत. 

उभारत्या अर्थव्यवस्था असलेल्या भारत आणि चीन या देशांचा विकासदर (जीडीपी) कमी होईल. तसेच भारतीय अर्थव्यवस्था चालू वर्षात 5.1 टक्क्यांनी वाढेल. तर आगामी वर्षात जीडीपी दर 6.1 टक्क्यांपर्यंत राहील, असे मत 'एडीबी'ने व्यक्त केले आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील रोकड टंचाई आणि वाढत्या  बेरोजगारीमुळे विकासदराला खीळ बसली आहे.  सप्टेंबरपासून तो 6.5 टक्के आणि 7.2 टक्के राहील, असे 'एडीबी'ने म्हटले आहे. गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने यंदा विकासदर 5 टक्के राहील,असा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने 6.1 टक्के जीडीपीचा अंदाज वर्तविला होता. मात्र औद्योगिक क्षेत्रातील मंदीने विकासाला ब्रेक लागला आहे. 

आशियाच्या विकासदरात घट 
 'एडीबी'ने आशियाचा विकासदर 5.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी  'एडीबी'ने आशियाचा विकासदर 5.4 टक्क्यांचा अंदाज वर्तविला होता. आशियातील खंडातील मंदीचा प्रभाव सर्व देशांना बसणार आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे चीनमधील उद्योगांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परिणामी येत्या वर्षात चीनचा वृद्धीदर कमी होईल. बॅंकेने चीनचा विकासदर चालू वर्षासाठी 6.1 टक्के आणि पुढील वर्षासाठी 5.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा आशियातील विकसनशील देशांवर देखील परिणाम झाला आहे. महागाई दरात होणारी वाढ उभरत्या अर्थव्यवस्थांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे मत 'एडीबी'चे मुख्य अर्थतज्ज्ञ यासुयुकी सवादा यांनी व्यक्त केले आहे. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतीमुळे 2019 आणि 2020 या वर्षात आशियातील महागाई दर अनुक्रमे 2.8 टक्के आणि 3.1 टक्के राहील, असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे. 

loading image