6 महिन्यात 115 टक्क्यांच्या रेकॉर्डवर, या स्टॉकमध्ये पुढेची तेजीचे संकेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shares

6 महिन्यात 115 टक्क्यांच्या रेकॉर्डवर, या स्टॉकमध्ये पुढेची तेजीचे संकेत...

मुंबई : शेअर बाजारात पैसा वेगाने वाढतो. मात्र, योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली नाही, तर तोटा होण्याचाही धोका असतो. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या शेअर्सनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्यात सातत्याने वाढ होत आहे. हेही वाचा - महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 115 टक्‍क्‍यांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. होय, आम्ही टीसीपीएल (TCPL) पॅकेजिंग लिमिटेडच्या शेअर्सबाबत बोलत आहोत. टीसीपीएलच्या शेअर्सनी शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात बीएसईवर 17 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत 1,696 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून येते आहे. यात एकाच महिन्यात 32 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 39.5 कोटी रुपयांचा नेट प्रॉफीट नोंदवला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीत 10.6 कोटी रुपयांच्या तुलनेत हा नफा दुप्पट आहे. त्यांचा कंसोलिडेटेड रेव्हेन्यू या तिमाहीत 43 टक्क्यांनी वाढून 361.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

टीसीपीएल पॅकेजिंग लिमिटेड (TCPL) संपूर्ण उद्योगातील ग्राहकांसाठी पॅकेजिंग सोल्यूशन्सची निर्माता आहे. टीसीपीएल प्रिंटेड कॉर्क-टिपिंग पेपर, लॅमिनेट, स्लीव्हज आणि रॅप-अराउंड लेबल्स सतयार करते. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. देशातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. टीसीपीएल पॅकेजिंग शेअर्सने अवघ्या सहा महिन्यांत 115 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market