Government Scheme : पती-पत्नीला महिना 10,000 रुपये पेन्शन, अशी आहे सरकारची स्किम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moeny

दर महिन्याला ५००० रुपयांपर्यंतच्या पेन्शनची सुविधा

१८ ते ४० वयोगटातील मुलं करू शकतात अर्ज

Government Scheme : पती-पत्नीला महिना 10,000 रुपये पेन्शन, जाणून घ्या स्किम

सरकारच्या पेन्शन स्कीम (Sarkari Pension Scheme) अटल पेन्शन योजनेत सहभाग घेऊन पती -पत्नी दोघांना १० हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळवू शकते. सरकार या योजनेची हमी देते. जर म्हतारपणी दर महिन्याला तुम्हाला ५ हजार रुपण आणि तुमच्या पत्नीला ५००० रुपये पेन्शन मिळाली तर आर्थिक तंगीतून थोडी कमी होऊ शकती.

सर्वात खास गोष्ट ही आहे की, तुमचे वय ४० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे जर तुमचे वय ४० वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही म्हातारपणी उत्पन्नासाठी Atal Pension Yojana मध्ये गुंतवणूक करू शकता. भारतीय नागरीक असलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते आणि जास्ती जास्त ५००० रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता.

हेही वाचा: Bank Holidays: पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; जाणून घ्या

प्रत्येक महिन्याला पेन्शनची गॅरंटी

केंद्र सरकारने अटल पेन्शन योजनेमध्ये दर महिन्याला पेन्शनची गॅरंटी देऊ शकतो. मोदी सरकारने अटल पेंन्शन योजनेची सुरुवात मे २०१५ मध्ये केली आहे. तुम्ही या स्किममध्ये सहभाग घेऊन महिन्याला कमीत कमी १००० रुपये आणि जास्तीत जास्त ५००० रुपये पेन्शन मिळवू शकता. ६० वय पूर्ण होताच तुम्हाला ही पेन्शन मिळू शकते.

जर तुमचे वय १८ ते ४० च्या दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ होऊ शकते. योजनेअंतर्गत पेन्शन मिळविण्यासाठी कमीत कमी २० वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ६० वय पूर्ण होईपर्यंत एक ठराविक रक्कम भरायला हवी.

जर १८ वर्षांचा तरुणाने अटल पेन्शन योजनेमध्ये सहभाग घेतला तर त्याला महिन्याला ५००० रुपये पेन्शन मिळविण्यासाठी महिन्यासाठी २१० रुपये गुंतवणूक करावी लागेल. तेच केवळ १०० रुपये महिन्याला पेन्शनसाठी १८ वर्षाच्या युवकाला महिन्याला ४२ रुपये जमा करावे लागतील. या स्किमची सर्वात मोठी विशेषता ही आहे की, यामध्ये गुंतवलेले पैसे कधीही बुडणार नाही.

हेही वाचा: Bank Holidays: पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; जाणून घ्या

गुंतवणूकीमध्ये पैसे बुडणार नाही

जर गुंतवणूकदार ६० वर्षाच्या वयापूर्वी तुम्ही तुमचे पैसे हवे असेल तर काही परिस्थितीमध्ये ते शक्य आहे. तसेच पतीच्या मृत्यूनंतर ६० वर्षा आधी मृत्यू झाल्यास, पत्नीला पेन्शनची सुविधा मिळणार. पती-पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर वारसदाराला सर्व पैसे परत मिळू शकतात.

अटल पेंशन योजनेमध्ये अंकाऊट सुरू करण्यासाठी तुमच्याकडे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट असले पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड आणि अॅक्टिव्ह मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. या स्किममध्ये पैसे जमा झाल्यास मासिक, तिमाही आणि सहामाही सुविधा मिळते. तसेच अॅटो डेबिटची सुविधा मिळत आहे म्हणजे पैसे अपोआप अकांउटमधून वजा होतात.

अटल पेंशन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पेंशन मिळविण्यासाठी टॅक्सची वाचवू शकता. या स्किममध्ये गुंतवणूक करून तुम्ही दिड लाख रुपये टॅक्स वाचवू शकता. ही सुट आयकर कलम 80C अंतर्गत मिळते.

टॅग्स :Pension