esakal | आरबीआय बॉण्ड्स: गुंतवणुकीचा एक सुरक्षित आकर्षक पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

आरबीआय बॉण्ड्स: गुंतवणुकीचा एक सुरक्षित आकर्षक पर्याय

सरकारने मार्च अखेरीस अल्पबचत योजनांवरील व्याजदर खूपच कमी केले. मुद्दल सुरक्षित ठेवून 7.75 टक्के खात्रीशीर परतावा देणारे 'आरबीआय बॉण्ड्स' हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आता अधिकच आकर्षक झाला आहे.

आरबीआय बॉण्ड्स: गुंतवणुकीचा एक सुरक्षित आकर्षक पर्याय

sakal_logo
By
अतुल सुळे

मार्च महिन्यात अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर परत एकदा कमी केले. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने एफडीवर देण्यात येणारे सर्वाधिक व्याजदर 5.9 टक्क्यांवर आणले. ज्येष्ठ  नागरिकांना देण्यात येणारा 0.5 टक्के अधिक व्याजदर लक्षात घेता, हा व्याजाचा दर 6.4 टक्के होतो. त्यापाठोपाठ सरकारने मार्च अखेरीस अल्पबचत योजनांवरील व्याजदर खूपच कमी केले. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर एप्रिल ते जून 2020 तिमाहीसाठी 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर, तर 'सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम'वरील व्याजदर  8.6 टक्क्यांवरून 7.4 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. या परिस्थितीत, मुद्दल सुरक्षित ठेवून 7.75 टक्के खात्रीशीर परतावा देणारे 'आरबीआय बॉण्ड्स' हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आता अधिकच आकर्षक झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 आता या बॉण्डची काही ठळक वैशिष्ट्ये 

1) योजनेचे नाव 7.75 टक्के गव्हन्मेंट ऑफ इंडिया, (टॅक्सबल) बॉण्ड्स 2018. केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक हे कर्जरोखे जारी करीत असल्याने यांना 'आरबीआय सेव्हिंग बॉण्ड' असेही म्हणतात. 

2) मुदत: सात वर्षे सर्वसामान्यांसाठी, मात्र 60 ते 70 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 6 वर्षांनंतर 70 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांनंतर, तर 80 वर्षावरील अतिज्येष्ठ नागरिकांना 4 वर्षांनंतर थोडा दंड भरून पैसे परत मिळू शकतात.

3) व्याजदर वार्षिक 7.5 टक्के वार्षिक 

4)पर्याय- क्युम्युलेटिव्ह 7 वर्षानंतर एक हजार रुपयांचे 1703 रुपये होतात.

नॉन-क्युम्युलेटिव्ह- अर्ध वार्षिक व्याज मिळते. 
31 जुलैपर्यंतचे व्याज 1 ऑगस्ट रोजी आणि 31जानेवारीपर्यंतचे व्याज 1 फेब्रुवारीला मिळते.

5) कोण गुंतवणूक करू शकते -  निवासी भारतीय व हिंदू अविभक्त कुटुंब (एचयुएफ) अनिवासी भारतीय बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. पण ते नॉमिनी असू शकतात.

6) बॉंड्सचे स्वरुप - फक्त डिमॅट

7) प्राप्तिकर - या कर्जरोख्यातील गुंतवणूकीवर कलम '80 सी'चा लाभ मिळत नाही व मिळणारे व्याज ज्याच्या त्याच्या टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे करपात्र असते. वर्षभरातील व्याज, रु. 40 हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्यास 10 टक्के उद्गम कपात (टीडीएस) करण्यात येते.

8)तरलता -  हे कर्जरोखे दुय्यम बाजारात विकता येत नाहीत व त्यावर कर्ज मिळत नाही. 

9) कधी मिळतात -  'ऑन टॅप ' पद्धतीने, म्हणजे विक्रीचा ठराविक काळ नसतो, तुम्ही कधीही खरेदी करू शकता.

10) कोठे मिळतात -  सरकारी बॅंका, काही खासगी बॅंका (उदा. आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, अॅक्सिस बॅंक), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आपला ब्रोकर / डिस्ट्रिब्युटर

11) गुंतवणूक मर्यादा - कमीत कमी रु. एक हजार व त्याच्या पटीत व जास्तीत जास्त कितीही (मर्यादा नाही). अशा प्रकारे मुद्दल सुरक्षित ठेवून, आकर्षक व खात्रीशीर परतावा देणारी ही योजना दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीसाठी उत्तम वाटते.

loading image