
‘अर्थ’बोध : वॉरन बफे - मास्टर ऑफ द मार्केट
‘वॉल स्ट्रीट रीडर’चे संपादक जे स्टीली यांचे हे पुस्तक, गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांचा अगदी बालपणापासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करते. जिलेट, वॉशिंग्टन पोस्ट, कोकाकोला, सॉलोमन ब्रदर्स आदी कंपन्यातील मोठा हिस्सा त्यांनी का व कधी खरेदी केला, याचे विश्लेषण सुद्धा या पुस्तकात वाचायला मिळते. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने गुंतवणुकीचे नऊ नियम सांगितले आहेत, ते असे -
कंपनीच्या ताळेबंदातील व नफा-तोटा पत्रकातील आकडे काय सांगतात, ते समजून घ्या.
ज्या कंपनीची वस्तू किंवा सेवा तुम्हाला समजते, आवडते त्याच कंपनीत गुंतवणूक करा.
कंपनीचे भवितव्य कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी भरपूर वाचन करा, फक्त कंपनीचीच नव्हे, तर कंपनीच्या स्पर्धकांची सुद्धा जास्तीत जास्त माहिती मिळवा.
कोणतेही शेअर खरेदी करताना पुरेसे ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ आहे की नाही, ते नीट तपासून पाहा.
यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी गुंतवणूक या विषयाबद्दल ‘फॅनॅटिक’ म्हणजे अतिउत्साही व्हावे लागते.
अति लोकप्रिय झालेले शेअर खरेदी करणे टाळा.
यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ही गुंतवणूक पद्धत आणि चक्रवाढवृद्धीची अदभूत ताकद नीट समजून घ्या.
गुंतवणूक करण्यासाठी मार्केट पडण्याची वाट पाहा, मग त्याला किती का वर्षे लागेनात!
एखादा शेअर खूप जण खरेदी करीत आहेत म्हणून खरेदी करणे टाळा, स्वतंत्ररित्या आणि जगावेगळा विचार करायला शिका.
वॉरन बफे यांच्या गुंतवणूक पद्धतीचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.
Web Title: Atul Sule Warren Buffett Master Of The Market
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..