esakal | अर्थबोध : ‘द धंधो इन्व्हेस्टर’ I The Dhandho Investor
sakal

बोलून बातमी शोधा

The Dhandho Investor

अर्थबोध : ‘द धंधो इन्व्हेस्टर’

sakal_logo
By
अतुल सुळे

जास्त परतावा मिळविण्यासाठी जास्त धोका पत्करावा लागतो, असा एक समज गुंतवणूकदारांमध्ये प्रचलित आहे. परंतु, कमी धोका पत्करून सुद्धा चांगला परतावा मिळविता येतो, हे बेंजामिन ग्रॅहॅम चार्ली मंगर आणि वरील पुस्तकाचे लेखक मोहनीश पब्राय यांनी दाखवून दिले आहे. मोहनीश पब्राय यांच्या इन्व्हेस्टमेंट फंडाने १९९९ ते २००६ या सात वर्षांत गुंतवणूकदारांना कमी जोखीम पत्करून सुद्धा २८ टक्के परतावा मिळवून दिला! ‘द धंधो इन्व्हेस्टर’ या आपल्या पुस्तकात त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत ती अशी-

एखाद्या ‘स्टार्टअप’मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा काळाच्या कसोटीवर उतरलेल्या जुन्या व्यवसायातच गुंतवणूक करा-

तुम्हाला स्वतःला समजेल अशा व्यवसायातच गुंतवणूक करा.

ज्या कंपन्यांनी स्वतः भोवती खंदक खणून त्यात मगरी सोडल्या आहेत, म्हणजेच स्पर्धकांचे काम अवघड करून ठेवले आहे, अशा कंपन्यांत गुंतवणूक करा.

योग्य संधी समोर येताच मोठी गुंतवणूक करा, इतर वेळी शांत बसा.

‘आर्बिट्राज’ म्हणजे जोखमीविना परतावा मिळत असेल तर ती संधी सोडू नका.

नेहमी भरपूर ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ असेल तेव्हाच खरेदी करा.

कमी जोखीम असलेल्या उद्योगात गुंतवणूक करा.

नवी संकल्पना घेऊन आलेल्या उद्योगांपेक्षा यशस्वी उद्योगांच्या मॉडेलची नक्कल करणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक करा.

मोहनीश पब्राय हे स्वतः जाहीरपणे सांगतात, की गुंतवणूक गुरु वॉरन बफे व चार्ली मंगल यांची कॉपी करूनच ते यशस्वी झाले. ‘हेड्स आय विन, टेल्स आय डोन्ट लूज मच’ ही रणनीती मोटेल मालक पटेल, स्टीलकिंग लक्ष्मी मित्तल आणि ‘व्हर्जिन’चे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी कशी यशस्वीरित्या राबविली, हे या पुस्तकात लेखकाने समजावून सांगितले आहे. हे पुस्तक गुंतवणूकदारांना एक वेगळाच दृष्टीकोन देत असल्याने निश्चितच वाचनीय आहे.

loading image
go to top