esakal | अर्थबोध : ‘द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग’
sakal

बोलून बातमी शोधा

The Most Important Thing

अर्थबोध : ‘द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग’

sakal_logo
By
अतुल सुळे

‘द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग’ या पुस्तकाचे लेखक हॉवर्ड मार्क्स हे ओक ट्री कॅपिटल मॅनेजमेंट या कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक आहेत. ही कंपनी सुमारे १५६ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीचे व्यवस्थापन करते. या पुस्तकात लेखकाने शेअर बाजारातून यशस्वीरित्या पैसा कमवायचा असेल तर कोणत्या गोष्टी नीट समजून घेणे खूप महत्त्वाचे असते, ते सांगितले आहे. त्यापैकी काही ठळक गोष्टी अशा -

  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला ज्या व्यवसायात गुंतवणूक करायची आहे, त्याचे खरेखुरे मूल्य काय आहे, ते ठरवावे लागते.

  • एखाद्या व्यवसायाचे मूल्य हे त्याच्याकडे असलेली संपत्ती आणि त्या संपत्तीतून भविष्यकाळात किती कॅश-फ्लो निर्माण होऊ शकतो यावर अवलंबून असते. हे मूल्य मूलभूत विश्लेषणाद्वारे ठरवावे लागते.

  • कंपनीच्या शेअरचा भाव मात्र अगदी सहजगत्या उपलब्ध असतो व तो मागणी, पुरवठा, सेंटिमेंट आणि काही तांत्रिक घटकांवर अवलंबून असतो.

  • खऱ्या गुंतवणूकदाराला शेअरचे मूल्य आणि भाव यातील फरक नीट समजून घेणे आवश्यक असते. भाव किंवा किंमत आपण देतो, तर मूल्य आपल्याला मिळते.

  • जेव्हा शेअरचा भाव मूल्यापेक्षा खूपच कमी असतो तेव्हा खरेदी आणि भाव मूल्यापेक्षा खूपच अधिक असेल तेव्हा विक्री केल्यासच गुंतवणूकदार बाजारात यशस्वी होऊ शकतो.- रिस्क म्हणजे जोखीम आणि व्होलॅटिलीटी म्हणजे भावातील चढ-उतार यातील फरक नीट समजून घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते. मार्केट पडल्याने आपल्या पोर्टफोलिओचे मूल्य तात्पुरते कमी झाले तर त्याला ‘व्होलॅटिलीटी’ कारणीभूत आहे, असे म्हणता येईल. पण मूल्य जर पडलेल्या भावात शेअर विकल्याने कायमस्वरूपी घटले तर त्याला ‘रिस्क’ असे म्हणता येईल.

  • कमी जोखीम पत्करून चांगला परतावा कसा मिळवावा, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

loading image
go to top