ऑटोमोबाईलचे ग्रहण सुटेना; जून महिन्यात वाहन विक्रीत घट

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

नवी दिल्ली: देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी जून महिन्यातही सुरू आहे. जून महिन्यात वाहन विक्रीमध्ये 12.3 टक्क्यांची घट झाली आहे. जूनमध्ये एकूण 19 लाख 97 हजार 952 वाहनांची विक्री झाली आहे. वाहनांच्या प्रत्येक विभागातील घट ही दोन आकडी आहे. अर्थव्यवस्थेत रोकडचा अभाव असल्याचा मोठाच फटका वाहन व्यवसायाला बसला आहे. सर्वच श्रेणीतील वाहनांची विक्री घटली आहे.

 महिंद्रा अॅंड महिंद्रा आणि ह्युंदाई मोटरने बाजारात आणलेल्या एसयुव्ही प्रकारातील वाहनांमुळे वाहन विक्रीतील घट काहीशी सावरली गेली आहे. मागील काही वर्षात ऑटोमोबाईल क्षेत्राने विक्रीतील घट अनुभवली नव्हती. नजीकच्या काळात येऊ घातलेल्या उत्सवी सिझनमुळे विक्रीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. सध्या वाहन उत्पादक कंपन्या अशा परिस्थितीत आहेत की त्यांचा वाहन निर्मितीचा खर्च हा महसूलापेक्षा जास्त आहे. व्यावसायिक, प्रवासी अशा सर्वच वाहन प्रकारात विक्रीचा खप घसरला आहे. दुचाकी वाहनांचा खपही 11.7 टक्क्यांनी घटला आहे. जूनमध्ये 16 लाख 49 हजार 477 दुचाकींची विक्री झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto sales decline by 12.3% in June