'पोर्टफोलिओ' करताय चुका टाळा...

portfolios
portfolios

गुंतवणूक करताना गुंतवणूकदार एक सर्वांत मोठी चूक नेहमी करतात. ती म्हणजे बाह्य प्रभावाच्या आधारावर गुंतवणूक करणे. या बाह्य प्रभावात मित्र, कुटुंबीय, नातेवाईक यांची गुंतवणूक, इंटरनेट अथवा म्युच्युअल फंडची लोकप्रियता आणि रॅंकिंग यांचा समावेश असतो. तुम्हाला सल्ला देणारे मित्र, नातेवाईक अथवा कुटुंबातील सदस्य यांचा पगार, जबाबदारी आणि उद्दिष्ट्ये सारखी नसतील तर त्यांच्या पोर्टफोलिओशी तुलना करणे शहाणपणाचे ठरत नाही. हाच निकष ऑनलाइन सल्ल्यांसाठीही लागू आहे. तुमच्या सल्लागाराने तुमची उद्दिष्टे आणि तुमचे उत्पन्न पाहून सल्ला दिला असेल तरच तो योग्य ठरेल. मात्र तसे नसेल तर, त्याचे अनुकरण करणे टाळा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कोणाचाच सल्ला ऐकू नका. तुमच्यावर होणारे परिणाम समजावून घेतल्याशिवाय बाह्य प्रभावाच्या आधारे निर्णय घेऊ नका, हा मुख्य मुद्दा आहे. मोठ्या प्रमाणात माहिती असणे हे जादुई असते परंतु, दुसऱ्याचा पोर्टपोलिओ अंधपणे स्वीकारु नये. कारण असे प्रकार बऱ्याचवेळा घडतात. तुम्हाला मिळणारी सर्व माहिती हुशारीने वापरा आणि त्यातून शिकून तुमचा पोर्टफोलिओ बनवा.

योजनेला भूतकाळात किती परतावा मिळाला होता याऐवजी भविष्यात ती किती परतावा देईल, यावर भर देऊन गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्या. यामध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर भर द्या मात्र, त्याच्याशी निगडित खर्च आणि इतर बाबींकडे फारसे लक्ष देऊ नका. तुमची जोखीम स्वीकारण्याची ताकद आणि गुंतवणूक पद्धती यानुसार म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करण्याच्या काही टिप्स बघुया.

1) गेली अनेक वर्षे चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी असणाऱ्या आणि तुमची ‘रिस्क प्रोफाईल’ व ‘फायनान्शियल गोल’शी जुळणाऱ्या काही योजना निवडा. 

2) यातून तुमचे ‘रिस्क प्रोफाईल’, ‘फायनान्शियल गोल’ आणि उद्देश यांच्याशी सुंसगत योजना निश्‍चित करा. म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणुकीस सुरूवात करताना फायनान्शियल गोल आणि विशिष्ट कालावधीसाठी किती पैसे गुंतवावे लागतील, याकडे गुंतवणूकदार लक्ष देत नाहीत, त्यामुळे हे महत्वाचे आहे. ‘ऑनलाइन रिसर्च’ करुन ‘टॉप परफॉर्मिंग’ योजना निवडण्यावर प्रामुख्याने भर हवा. मात्र त्या योजना तुमच्यासाठी योग्य आहेत का? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधण्याची गरज आहे. 

3) यातील प्रत्येक योजनेत किती टक्के गुंतवणूक करु शकता हे निश्‍चित करा.

4) तुम्ही रक्कम निश्‍चित केल्यानंतर नियमित कालावधीत तुमची फंड तपासण्याची व्यवस्था तयार करा. तुम्हाला गरज असेल तेव्हा ‘रिव्ह्यू’ अथवा ‘करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’द्वारे हे करता येईल. ही पायरी अतिशय महत्वाची आहे. कारण, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीम आणि अस्थिरतेच्या अधीन असते. अर्थव्यवस्था आणि बाजारावर परिणाम करणारी कोणतीही बातमी तुमच्या पोर्टफोलिओवर मोठा परिणाम करु शकते. त्यामुळे कायम तुमच्या ‘पोर्टफोलिओ’वर बारकाईने लक्ष ठेवा आणि ‘ॲसेट अलोकेशन’ आणि ‘रिलोकेशन’ करण्याची योग्य कृती करा. पैसे भरा, बंद करा आणि विसरून जा, अशा विचारसणीचे अनुसरण करु नका. कारण आपण सतत बदलत जाणाऱ्या जगात राहात आहोत आणि तुम्ही हा  लेख वाचत असतानाही काही गोष्टी बदललेल्या असतील. यामुळेच दक्ष राहा.

5) तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर, तुम्हाला पैशांची गरज लागणार आहे त्याआधी किमान दोन ते तीन वर्षे पैसा बॅंक ठेवी अथवा डेट फंड यासारख्या सुरक्षित आर्थिक उत्पादनांकडे वळविण्यास सुरूवात करा. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  आर्थिक पातळीवरील परिणाम सध्या आपण पाहत आहोत. त्यामुळे ‘इक्विटी’मध्ये गुंतवणूक करणारा व्यक्ती २०२० मध्ये ‘फायनान्शियल गोल’ पूर्ण करण्यासाठी पैसे काढणार असेल तर, तो किती संकटात सापडला असता हे पाहा. यामुळे काही काळ आधी गुंतवणूक दुसरीकडे वळविणे सोईस्कर ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com