53 हजार कोटी रुपये दान करणारा भारतीय माणूस.. तुम्हाला माहीत आहे?

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

बंगळुरू: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या संपत्तीतील 52,750 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमजी त्यांच्या मालकीचे 34 टक्के शेअर आता दान करणार आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी 145,000 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अझीम प्रेमजी फाउंडेशनने आता बिल गेट्स यांच्या फाउंडेशनला मागे टाकत सर्वाधिक रक्कम दान करण्याचा विक्रम केला आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या मार्फत गरीब, वंचित आणि मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. प्रेमजींनी एकूण 1 लाख 45 हजार कोटी रुपये इतकी रक्कम सामाजिक कार्यासाठी दिल्याने ती सर्वाधिक निधी देणारी कॉरपोरेट संस्था ठरली आहे.  

सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे 1 लाख 54 हजार 919.78 कोटींचे बाजारभांडवल आहे. आज (गुरुवार) मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 257.55 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Azim Premji commits Wipro shares worth Rs 52,750 crore for philanthropy