बजाज ऑटो आता बनली ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ 

World-Favorite-Indian
World-Favorite-Indian

पुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील प्लॅंटमधून २००१ मध्ये लाँच केलेल्या पल्सरच्या माध्यमातून बजाज ऑटोने सर्वप्रथम आपला ठसा जागतिक पातळीवर उमटवण्यास सुरवात केली. ‘हमारा बजाज’ हे मूळ ब्रीद न विसरता कंपनीने नवकल्पना आणि तंत्रज्ञानातून केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील ७० देशांतील नागरिकांची पहिली पसंती बनण्याची कामगिरी बजावली आहे. बजाज ऑटो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा मोटारसायकल निर्यातदार बनला आहे. कंपनीने गेल्या १० वर्षांत १३ अब्ज डॉलर एवढ्या विदेशी चलनाची कमाई केली असून, २०१८ मध्ये २ मिलियन युनिटच्या विक्रीचा विक्रम केला आहे. त्यामुळेच बजाज ऑटोने अगदी अभिमानपूर्वक ‘बजाज-  द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवीन ओळख धारण केली आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com