बंधन बॅंकेचा नफा 701 कोटींवर 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या बंधन बॅंकेने जूनअखेर सरलेल्या तिमाहीत 701.14 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. बंधन बॅंकेच्या नफ्यात 45.5 टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे. बॅंकेच्या निव्वळ व्याजातून मिळालेल्या उत्पन्नात आणि इतर उत्पन्नातसुद्धा चांगलीच वाढ झाल्यामुळे बॅंकेचा नफा वाढला आहे. मागील वर्षी याच कालावधीत बंधन बॅंकेने 481.71 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. निव्वळ व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात 48.18 टक्क्यांची भरघोस वाढ होऊन ते 312.21 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

गेल्यावर्षी याच कालावधीत बॅंकेचे हेच उत्पन्न 210.69 कोटी रुपये होते. बंधन बॅंकेच्या एकूण थकित कर्जाचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण 2.02 टक्क्यांवर आले आहे. तर निव्वळ थकित कर्जातसुद्धा घट होत ते 0.64 टक्क्यांवरून 0.56 टक्क्यांवर आले आहे. विविध तरतूदी आणि आपत्कालीन निधीची तरतूद 56.70 टक्क्यांनी वाढून 125.40 कोटी रुपयांवर पोचली आहे. याच कालावधीत मागील वर्षी ही रक्कम 80.03 कोटी रुपये होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bandhan Bank Q1 profit beats Street, rises 45.5 pct